शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन

By हणमंत गायकवाड | Published: April 06, 2024 1:01 PM

लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आठ दिवसात ऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. लातूर शहराला महिन्याला एक दलघमी पाण्याची गरज आहे. तर मांजरा प्रकल्प वरील सर्व योजना मिळून महिन्याला दोन दलघमी पाणी लागते. या सर्व बाबींचा विचार केला तर, सध्याचा उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत मांजरा प्रकल्पातील पाणी पुरवू शकते. त्यामुळेही पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मांजरा प्रकल्पात एकूण पाणीसाठा ५९ दलघमी आहे. यातील १२ दलघमी जिवंत तर ४७ दलघमी मृत पाणीसाठा आहे. मांजरा प्रकल्पात वरील सर्व पाणीपुरवठा योजनांना त्यांच्या मागणीनुसार पाणी उचल झाले तरी उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत प्राप्त पाणीसाठा पुरवू शकतो. लातूर शहरासाठी दररोज ५५ ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काटकसर या नावाखाली शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणी उचलणे बंद होते. यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. शहरातील जलकुंभनिहाय वितरणाचे वेळापत्रक तयार केले जात आहे.

शहरातील अनेक विद्युत पंप आटलेलातूर शहरात विद्युत पंप आणि हातपंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांचे पाणी गेलेले आहे. त्यामुळे आठ दिवसातला सोडण्यात येणारे पाणी शहरवासीयांना पुरत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेही आता पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पंपाची पाणी पातळी घटली आहे. या पंपाच्या जीवावर महापालिकेने आठ दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या महिनाभरापासून सुरू केला होता. मात्र अनेक भागातून पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने आता पाच दिवसात पाणीपुरवठा केला जाईल.

शांतता समितीच्या बैठकीत आयुक्तांनी दिले संकेतशहरातील विद्युत पंपाचे पाणी पातळी घटलेली आहे. अनेक बोरचे पाणी गेलेले आहे त्यामुळे शांतता समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे.

मांजरा प्रकल्पातील स्थितीप्रकल्पात सध्या: ५९:२५८ दलघमीप्रकल्पात मृत पाणीसाठा : ४७:१३० दलघमीजिवंत पाणीसाठा :१२:१२८ दलघमीजिवंतपाणीसाठ्याची टक्केवारी : ६.८५ टक्के

टॅग्स :laturलातूरWaterपाणी