शैक्षणिक क्षेत्रात शोककळा! ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; तीन शिक्षकांसह चालकाचा मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: December 22, 2023 10:51 IST2023-12-22T10:48:21+5:302023-12-22T10:51:51+5:30

औशाजवळ झाला अपघात, अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन ३० फुटावर जावून पडले.

Mourning in the education sector! Terrible tractor-car accident near Ausa; Driver dies along with three teachers | शैक्षणिक क्षेत्रात शोककळा! ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; तीन शिक्षकांसह चालकाचा मृत्यू

शैक्षणिक क्षेत्रात शोककळा! ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; तीन शिक्षकांसह चालकाचा मृत्यू

- महेबूब बक्षी
औसा : तालुक्यातील शिवलीहून औशाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने कार चालकासह तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १२:५० वाजता औशाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर घडली.

अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन ३० फुटावर जावून पडले. पोलिस, रुग्णवाहिका आरोग्य कर्मचारी व नागरिकांना कारमधून पहाटे ४:३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. औसा ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मयत शिक्षकांमध्ये महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान यांचा समावेश आहे.

Web Title: Mourning in the education sector! Terrible tractor-car accident near Ausa; Driver dies along with three teachers