शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी साधला परदेशातील लातूरकरांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST

झोन मिटिंगद्वारे साधलेल्या या उपक्रमात दुबई, मस्कत, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यांनी कोरोना ...

झोन मिटिंगद्वारे साधलेल्या या उपक्रमात दुबई, मस्कत, जर्मनी, अमेरिका, सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. त्यांनी कोरोना उपाययोजनेबाबत सूचनाही मांडल्या. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली. दुबईस्थित हरिश दुनाखे व जर्मनी येथील स्थायिक मनोज येलगट्टे यांनी पुढाकार घेतला. सातासमुद्रापार असूनदेखील या सर्वांचे लातूरशी घट्ट नाते जडले आहे. यातूनच अशा संकटकाळात त्यांनी आरोग्यसेवेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.

या अनोख्या चर्चेमध्ये डॉ. नरेंद्र काळे, डॉ. सुजित निलेगावकर, डॉ. उन्मेष सेलूकर, डॉ. विष्णू बिराजदार, डॉ. अनय देशमुख, अर्चना अमलापुरे, डॉ. नामदेव सूर्यवंशी, नरेंद्र शिवणे, प्रमोद चिंचनसुरे, प्रवीण शास्त्री, संगीता शिंदे, शेखर जोशी, शुभांगी जोशी आदी सहभागी झाले होते.

जन्म आणि कर्मभूमीशी नाते

आपली कर्मभूमी आणि आपल्या कर्मभूमीला विसरू शकत नाही, या भावनेतून या मंडळींनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या माध्यमातून अद्ययावत माहिती, तंत्रज्ञान तसेच आर्थिक स्वरूपात मदत मिळू शकणार आहे. जगभरात वेळोवेळी होणारे बदल, आजाराचे बदलते स्वरूप आणि त्यावर केले जाणारे उपचार याबाबतही मार्गदर्शन होणार असल्याचे विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.