लातुरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:50 IST2019-03-07T14:41:13+5:302019-03-07T14:50:58+5:30

लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी सकाळी परिवार किराणा दुकानाला अचानक आग लागली. या भीषण आगीत किराणा दुकान खाक झाले असून, शेजारील मोबाईल शॉपीचेही मोठे नुकसान झाले आहे.

massive fire breaks out in shop at latur | लातुरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग

लातुरमध्ये किराणा दुकानाला भीषण आग

ठळक मुद्देलातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी सकाळी परिवार किराणा दुकानाला अचानक आग लागली.भीषण आगीत किराणा दुकान खाक झाले असून, शेजारील मोबाईल शॉपीचेही मोठे नुकसान झाले आहे.पीओपी जळून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले आहे.

लातूरलातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी सकाळी परिवार किराणा दुकानाला अचानक आग लागली. या भीषण आगीत किराणा दुकान खाक झाले असून, शेजारील मोबाईल शॉपीचेही मोठे नुकसान झाले आहे.

गंजगोलाई येथे मुजीब महंमद हुसेन शेख यांचे परिवार दुकान आहे. त्यांच्या दुकानाला सकाळी अचानक आग लागली. या आगीत दुकान खाक झाले असून अंदाजे 50 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. या किराणा दुकानाच्या शेजारी असलेल्या अहमद उस्मान शेख यांच्या फॉरेव्हर मोबाईल शॉपीलाही आग लागली. पीओपी जळून सुमारे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केल्यानंतर दोन बंब आले. या पथकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला अन् तासाभरात आग आटोक्यात आली. त्यामुळे या परिसरातील बाजारपेठेचे मोठे नुकसान टळले.

Web Title: massive fire breaks out in shop at latur