शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्ड सोयाबीनचा दर स्थिर; आवक घटलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला असून मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शिवारातील पीक वाया गेले आहे. ...

जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झाला असून मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शिवारातील पीक वाया गेले आहे. अतिपावसामुळे बुरशी आणि हळद्या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर पडला आहे. त्यामुळे काढणीला वेळ लागणार आहे. सध्या मिळत असलेला भाव राहतो की डाग असल्याचे कारण सांगून दर कमी केले जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या तरी चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनलाही चांगले दर मिळतील अशी अपेक्षा आहे.

सध्या बाजारात सोयाबीनला कमाल दर ९ हजार १०० रुपये तर किमान दर ६ हजार ७०० रुपये असून सर्वसाधारण दर ८ हजार ९१० रुपये आहे. हाच दर स्थिर राहिला तर शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल असे बोलले जात आहे. सध्या बाजारात साळ, गहू, ज्वारी, हरभरा,ज्वारी रब्बी, मका, हरभरा,तूर, मूग, उडीद आदी पिकांची आवक असून हरभऱ्याला कमाल दर ६ हजार ६४७ रुपये तर किमान दर ४ हजार ४०० आणि सर्वसाधारण ५ हजार रुपये आहे. मूग, उडीदाची आवकही कमीच आहे. मुगाची आवक ९७५ असून उडीदाची आवक २०६५ क्विंटल आहे. मुगाला सहा हजार रुपये तर उडीद आला सात हजार रुपयाचा दर सध्या बाजारात मिळत आहे.

सोया पेंड आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना नुकसान कारक...

केंद्र शासनाने सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन परदेशातून येण्याची वेळ आणि नवे सोयाबीन बाजारात येण्याची वेळ एकच असल्याने सोयाबीनचे भाव पडतील असे शेतकरी संघटनेसह शेतीशी निगडित असलेल्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोयाबीन आयातीला विरोध दर्शविला आहे. सोयापेंड आयात झाली तरी नव्या सोयाबीनचे दर सध्या सारखेच राहावेत अथवा ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.