Maratha Kranti Morcha : रेणापूर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:12 IST2018-07-24T17:11:52+5:302018-07-24T17:12:54+5:30
मराठा क्रांती मोर्च्याच्या महाराष्ट्र बंदला रेणापुर शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Maratha Kranti Morcha : रेणापूर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
रेणापूर ( लातुर ) : मराठा क्रांती मोर्च्याच्या महाराष्ट्र बंदला रेणापुर शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी पिंपळफाटा येथे ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाच्या सुरुवातीस कायगाव येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रदाजंली वाहून सरकारच्या धोरणाच निषेध करण्यात आला. बंदमध्ये रेणापूर शहरासह पानगाव , खरोळा , भोकरंबा, बिटरगाव आदी गावातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत प्रतिसाद दिला. यासोबतच सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.