हातउसन्या पैशावरुन वाद, तरुणाला चाकूने भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:38 IST2019-03-13T15:37:47+5:302019-03-13T15:38:12+5:30

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन विजय गायकवाड याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे

man stabbed the youth, latur man dispute issue on money | हातउसन्या पैशावरुन वाद, तरुणाला चाकूने भोसकले

हातउसन्या पैशावरुन वाद, तरुणाला चाकूने भोसकले

लातूर : हातउसने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरून बोलावून घेत एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना शहरातील प्रकाश नगर भागात घडली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन विजय गायकवाड याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 10 मार्च रोजी सायंकाळी 5.15 वाजता त्याला मनिष हजारे याने फोन करून जुन्या रेल्वेलाईनजवळ असलेल्या सार्थक पान स्टॉलवर बोलावले. उसने घेतलेले पैसे देतो असे सांगितले. त्यामुळे तिथे गेल्यानंतर सचिनने पैसे मागितले असता त्याने माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हटले. मग, मला कशाला बोलावलास असे सचिनने विचारले असता, मनिष आणि अतिष पाटोळे यांनी त्याला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर अतिषने त्याच्याजवळील चाकू सचिनच्या पोटात खुपसला. त्यावेळी तिथे आलेल्या बालाजी घोडके याने सचिनला मोटारसायकलवरून जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: man stabbed the youth, latur man dispute issue on money