पक्ष आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:33+5:302021-09-18T04:21:33+5:30

सध्या महाविकास आघाडीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. जो ...

Local body elections will be held as per the party order | पक्ष आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हाेणार

पक्ष आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हाेणार

सध्या महाविकास आघाडीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. जो काही पक्षादेश असेल ताे सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे होऊन अहवाल सादर केल्यानंतर कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे, रस्ते आणि त्यावरील पुलांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीकविमा भरण्यासंदर्भात ऑफलाईन पद्धतीने नुकसानभरपाईचे अर्ज घेण्यात येतील, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. जळकोटची नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या, जळकोटचा कायापालट करू तर जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करून मराठवाड्यातील एक मॉडेल तालुका म्हणून त्याला नावारूपाला आणू, असेही ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकाेट तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथआप्पा किडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे संचालक गजानन पाटील-दळवी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, महेश धुळशेटे, पाशा शेख, दिलीप कांबळे, दस्तगीर शेख, धनंजय धर्मांना, गोविंद ब्रह्मंना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक डांगे, बालाजी आगलावे, मनोहर वाकळे, संग्राम नामवाड, नितीन धुळशेटे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Local body elections will be held as per the party order