लातूरच्या सराफा बाजारात खळबळ; ७६ लाखाचे साेने घेवून बंगाली कारागिर पळाला !
By राजकुमार जोंधळे | Updated: October 8, 2022 18:53 IST2022-10-08T18:52:43+5:302022-10-08T18:53:41+5:30
लातुरातील सराफ बाजारात गेल्या काही वर्षांपासून कारागीर म्हणून काम करणाऱ्याने फसवले

लातूरच्या सराफा बाजारात खळबळ; ७६ लाखाचे साेने घेवून बंगाली कारागिर पळाला !
लातूर : येथील सराफा बाजारात पश्चिम बंगालचे कारागीर (साेनार) माेठ्या संख्येने दागिने तयार करण्याचे, घडविण्याचे काम करतात. यातील एका कारागिराने गेल्या आठवड्यात तीन ते चार सराफांनी दागिने तयार करण्यासाठी दिलेले तब्बल ७६ लाखांचे साेने घेवून पळ काढला आहे. अखेर त्याच्याविराेधात शनिवारी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, सराफा व्यापारी विकास माधवराव चामे (वय ५० रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील विनाेद सुधीर जाना (रा. रजहती बंद, खनकूल, हुगली) हा लातुरातील सराफ बाजारात गेल्या काही वर्षांपासून कारागीर म्हणून काम करत हाेता. दरम्यान, तक्रारदार आणि इतर सराफा व्यापाऱ्यांनी कारागीर विनाेद जाना याच्याकडे साेने आणि साेन्याचे दागिने असे एकूण १४६३ गॅम ७७० मीली ग्रॅम (किंमत ७६ लाख २६ हजार ४४४ रुपये) दागिने बनविणे, कडी काेंडे बसवण्यासाठी दिलेले हाेते. दागिने तयार करुन, कडीकाेंडे बसवून न देता विश्वासघात करुन कारगीर विनाेद जाना याने हे साेने घेवून पसार झाला आहे.
ही घटना ७ सप्टेंबर ते ३ ऑक्टाेंबर या काळात घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन शनिवारी गुरनं. ४१९ / २०२२ कलम ४०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे करत आहेत. तपास पाेलीस उपनिरीक्षक व्यंकट काेव्हाळे करत आहेत. त्याच्या शाेधासाठी पाेलीस प्रयत्न करत आहेत.