- हरी मोकाशे
लातूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत लातूर जिल्हा परिषदेने आपला ठसा उमटविला आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या दहा मुख्य कार्यक्षमता निर्देशांकांच्या आधारे करण्यात आलेल्या मूल्यांकनात लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांचे 'पोषण ट्रॅकर' ॲप्लिकेशनमधील माहितीच्या आधारे रँकिंग करण्यात आले. त्यात पूरक पोषण आहार वितरण, बालकांचे अचूक वजन मापन, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी, गर्भवती व स्तनदा मातांचे लसीकरण व समुपदेशनाची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लातूर जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
जिल्ह्याची कामगिरी (टक्केवारी)...पूरक पोषण आहार वितरण : ८५.७६मोजमाप कार्यक्षमता : ९९गृहभेट : ९९गंभीर तीव्र कुपोषण : ०.२१मध्यम कुपोषण : १.६२वजन कमी असलेली बालके : ६.८९खुंटलेली वाढ : १८.८४जादा वजन : ३.५२
२४ मार्च रोजी मुंबईत होणार गौरव...सामूहिक प्रयत्न...जिल्हा परिषदेचे सीईओ राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांनी 'पोषण ट्रॅकर'वर माहिती भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्यापर्यंत चोख कामगिरी बजावली. या उपक्रमात राज्यात वाशिमने प्रथम, भंडारा जिल्ह्याने द्वितीय तर लातूरने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
लवकरच जिल्हा कुपोषणमुक्तआगामी काळात आणखीन विशेष उपक्रमांतून कुपोषण निर्मूलन, बालकांचा सर्वांगिण विकास आणि सेवा वितरण अधिक बळकट करण्यावर भर राहणार आहे. भविष्यात जिल्हा कुपोषणमुक्त होईल.- राहुलकुमार मीना, सीईओ.
कामाची गती वाढविणारसीईओ राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी ताईंनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे. समन्वयाने आणखीन गती वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे.- जावेद शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.
Web Summary : Latur Zilla Parishad excels in ICDS implementation, securing third rank statewide and first in Marathwada. This achievement is due to effective nutrition tracking, weight monitoring, and dedicated efforts of Anganwadi workers, improving child health and reducing malnutrition in the district.
Web Summary : लातूर जिला परिषद ने आईसीडीएस कार्यान्वयन में उत्कृष्ट प्रदर्शन किया, जिससे राज्य में तीसरा और मराठवाड़ा में पहला स्थान प्राप्त हुआ। यह सफलता पोषण ट्रैकिंग, वजन निगरानी और आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के समर्पित प्रयासों के कारण मिली है, जिससे जिले में बाल स्वास्थ्य में सुधार हुआ है और कुपोषण कम हुआ है।