दोन तलवारींसह लातुरात तरुण पोलिसांच्या जाळ्यात !
By राजकुमार जोंधळे | Updated: August 29, 2022 22:56 IST2022-08-29T22:54:21+5:302022-08-29T22:56:02+5:30
पोलिसांनी सांगितले की, लातूर शहरात एक तरुण दोन तलवारी घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली.

दोन तलवारींसह लातुरात तरुण पोलिसांच्या जाळ्यात !
लातूर : शहरातील नांदेड रोड परिसरात दोन तलवारी घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सोमवारी सायंकाळी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने या तरुणाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत विवेकानंद चाौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, लातूर शहरात एक तरुण दोन तलवारी घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. दरम्यान, रहिम नगरात राहणारा १८ वर्शीय तरुण हा दोन तलवारी घेऊन फिरत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी छापा मारून त्याला अटक केली.
याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अंमलदार खंडू कलकत्ते, मुन्ना नलवाड, नारायण शिंदे यांच्या पथकाने केली.