Latur: शाेरूममधून गाडी काढली अन् लगेच झाला अपघात, लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: October 25, 2023 00:21 IST2023-10-25T00:20:19+5:302023-10-25T00:21:10+5:30
Latur Accident News: विजयादशमीच्या मुहूर्तावर लातुरातील बार्शी राेडवरील एका शाेरूममधून नवी काेरी गाडी बाहेर काढली अन् पाच मिनिटांच्या अंतरावरच अपघात झाला. पाठीमागून आलेली भरधाव ट्रक नव्या गाडीवर आदळल्याने माेठे नुकसान झाले.

Latur: शाेरूममधून गाडी काढली अन् लगेच झाला अपघात, लातुरातील घटना
- राजकुमार जाेंधळे
लातूर - विजयादशमीच्या मुहूर्तावर लातुरातील बार्शी राेडवरील एका शाेरूममधून नवी काेरी गाडी बाहेर काढली अन् पाच मिनिटांच्या अंतरावरच अपघात झाला. पाठीमागून आलेली भरधाव ट्रक नव्या गाडीवर आदळल्याने माेठे नुकसान झाले. याबाबत एमआयडीसी पाेेलिस ठाण्यात मात्र या अपघाताची नाेंद झाली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पाेलिसांनी सांगितले, विजयादशमीच्या मुहूर्तावर बार्शी राेडवर आसलेल्या वाहनाच्या शाेरूममधून नवीन गाडी खरेदी करून, ती बाहेर काढून जाताना पाठीमागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जाेराची धडक दिली. हा अपघात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बार्शी राेडवरील पाच नंबर चाैक परिसरात घडला. या अपघातानंतर दाेन्ही वाहने जाग्यावरच थांबवल्याने काही काळ वाहतूक काेंडी झाली हाेती. दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांना मिळाली. त्यांनी पाेलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवून वाहतूककाेंडी दूर केली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल आली नसून, गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असेही पाेलिस निरीक्षक दिवे यांनी सांगितले.