गोव्याची दारू लातूरच्या मार्गावर! राज्य उत्पादन शुल्काचा दणका, १५ लाखांचा दारुसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 13:06 IST2026-03-07T13:05:50+5:302026-03-07T13:06:50+5:30

भरारी पथकाने रचला सापळा; एकाच वेळी दोन ठिकाणी मोठी कारवाई

Latur: State Excise Dept Seizes Goa-Made Liquor Worth Rs 15 Lakh; 3 Arrested in Two Raids | गोव्याची दारू लातूरच्या मार्गावर! राज्य उत्पादन शुल्काचा दणका, १५ लाखांचा दारुसाठा जप्त

गोव्याची दारू लातूरच्या मार्गावर! राज्य उत्पादन शुल्काचा दणका, १५ लाखांचा दारुसाठा जप्त

 

लातूर : राज्यात अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक मोहीम हाती घेतली असून, लातूरमध्ये भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. चांडेश्वर पाटी (ता. जि. लातूर) परिसरात आणि येराेळ माेड ते उजळंब (ता. चाकूर) मार्गावर शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह जवळपास १४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पहिल्या घटनेत, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लातूर ते औसा रोडवरील चांडेश्वर पाटी येथे परराज्यातील मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती लातूरचे अधीक्षक केशव राऊत, उपअधीक्षक मारोती मुपडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचून संशयित इनोव्हा कारची झडती घेतली. यात गोवा राज्यातील विदेशी मद्याच्या १८० मि. ली. क्षमतेच्या २ हजार ६४ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने मद्यसाठा, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा ११ लाख ४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या दाेन्ही कारवाया भरारी पथकाचे निरीक्षक यू. व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक एस. पी. काळे, डी. एच. आशमोड, एस. के. वाघमारे, जी. व्ही. साळवे, आर. एम. माकाेडे, डी. डी. साळवी, सहायक दुय्यम निरीक्षक एन. टी. गुणाले, एस. एस. केंगार, जवान एस. जी. काळे, एस. के. पाटवदकर, आर. एस. चिंचाेलीकर, एस. बी. गड्डीमे, के. बी. गाेसावी, बी. ए. गायकवाड, व्ही. डी. गायकवाड, व्ही. एस. सुडके, एम. आर. हासुळे, ए. डी. वडवळे, एस. के. वाघमारे, जी. आर. हाेळकर, अनिरुद्ध देशपांडे, शैलेश गड्डीमे, बळीराम साखरे आदींच्या पथकाने केल्या आहेत.

येराेळ-उजळंब रस्त्यावर छापा; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
दुसऱ्या घटनेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने येरोळ मोड ते उजळंब (ता. चाकूर) रस्त्यावर मोठी कारवाई करत २ लाख ५४ हजार ४८० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली. एका इनोव्हा गाडीतून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक केली जात हाेती. पथकाने वाहनाची झडती घेतली असता, १८० मि. ली.च्या ३८४ बाटल्या, ७५० मि. ली.च्या २४ सीलबंद बाटल्या आढळल्या. यावेळी एकाला अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title : गोवा की शराब लातूर के रास्ते जब्त; आबकारी विभाग का छापा

Web Summary : लातूर में राज्य आबकारी विभाग ने 14.58 लाख रुपये की गोवा निर्मित शराब जब्त की। चांडेश्वर पाटी और येरोल-उजलंब मार्ग पर छापे में गिरफ्तारियां हुईं और वाहन जब्त किए गए। अवैध शराब व्यापार के खिलाफ कार्रवाई जारी है।

Web Title : Goa Liquor Seized En Route to Latur; Excise Department Cracks Down

Web Summary : State Excise Department seized ₹14.58 lakh worth of Goa-made liquor in Latur. Raids on Chandeshwar Pati and Yerol-Ujalamb road led to arrests and vehicle seizures. Action against illegal liquor trade continues.