लातूर हादरले! पती घरी उशिरा आला, संतापात पत्नीने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची केली हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:48 IST2026-01-20T12:39:18+5:302026-01-20T12:48:45+5:30

ज्या मातेने जन्म दिला, तिनेच रक्ताच्या नात्याला विसरत आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Latur shocked! Husband came home late, wife brutally murdered her one and a half year old daughter in anger! | लातूर हादरले! पती घरी उशिरा आला, संतापात पत्नीने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची केली हत्या!

लातूर हादरले! पती घरी उशिरा आला, संतापात पत्नीने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीची केली हत्या!

लातूर : शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात एक मन सुन्न करणारी घटना साेमवारी उघडकीस आली. केवळ पतीस कामावरून घरी येण्याला उशीर झाला, या क्षुल्लक कारणावरून एका संतापलेल्या मातेने आपल्याच पाेटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. पाेलिसांनी आराेपी मातेला अटक केली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी विक्रम जगन्नाथ चौगुले (वय ३४, रा. हासेगाव ता. कळंब जि. धाराशिव, ह.मु. श्याम नगर, लातूर) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. १९ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास, विक्रम हे कामावरून घरी परतण्यासाठी काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी आरोपी अश्विनी विक्रम चौगुले (वय ३०) हिचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात असलेल्या अश्विनीने घरातील धारदार चाकू घेतला अन् आपली दीड वर्षांची निष्पाप मुलगी नंदिनी विक्रम चौगुले हिच्यावर अत्यंत क्रूरपणने सपासप वार केले. आरोपी मातेने चिमुकल्या नंदिनीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नंदिनी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ज्या मातेने जन्म दिला, तिनेच रक्ताच्या नात्याला विसरत आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मयत नंदिनीचे वडील विक्रम चौगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोउपनि. एस.एम. मोरे हे करत आहेत.

आराेपी मातेला घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस निरीक्षक समाधान चवरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. कौटुंबिक वादातून अथवा क्षणिक रागातून मातेने एका पाेटच्या गाेळ्याचा बळी घेतला आहे.

Web Title : लातूर में सनसनी: पति के देर से आने पर पत्नी ने बच्ची को मारा!

Web Summary : लातूर में एक महिला ने पति के काम से देर से लौटने पर अपनी 1.5 साल की बेटी की बेरहमी से हत्या कर दी। गुस्से में मां ने चाकू से वार कर जान ले ली। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जांच जारी है।

Web Title : Latur Shaken: Wife Kills Toddler Over Husband's Late Return!

Web Summary : In Latur, a woman brutally murdered her 1.5-year-old daughter after her husband returned home late from work. The enraged mother used a knife, inflicting fatal wounds. Police arrested the accused, and an investigation is underway.