लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:03 IST2026-02-16T14:00:59+5:302026-02-16T14:03:20+5:30

"लातूरच्या भरवस्तीत दिल्लीच्या चोरांचा थरार!" भूमिगत केबलवर डल्ला मारणारी टोळी रंगेहात पकडली

Latur Police Bust Delhi-Based Cable Theft Gang; Three caught red-handed while stealing BSNL's underground cable worth lakhs | लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले

लातुरात दिल्लीची 'केबल गँग' जेरबंद; 'BSNL'चे लाखोंचे केबल चोरताना तिघांना रंगेहात पकडले

लातूर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मिनी मार्केट सिग्नल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात भरदिवसा ‘बीएसएनएल’च्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या दिल्लीच्या ‘हायटेक’ टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजी नगर पोलिसांनी या टोळीतील तिघांना चोरीच्या साहित्यासह रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, रविवार, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास, मिनी मार्केट ते सात मजली इमारतीच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू होत्या. आरोपींनी ‘बीएसएनएल’च्या डक्टमधून १००० पेअर आणि ८०० पेअरच्या सुमारे ४०० मीटर लांबीच्या केबल बाहेर काढून त्याचे तुकडे केले होते. पोलिसांनी छापा मारु ज्यांना ताब्यात घेतले आहे, ते सर्व आरोपी दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समाेर आले आहे. यामध्ये जगप्रित चरणजित सिंग (वय ३६, रा. ख्याला जे.जे. कॉलनी, दिल्ली), दानिश मुलतान खान (वय २२) आणि अविशेककुमार विनोदकुमार (वय ३०, दाेघेही रा. ख्याला विष्णू गार्डन, दिल्ली) यांचा समावेश आहे. हे आरोपी लातूरमध्ये केवळ चोरीच्या उद्देशाने आले होते का? याचा तपास आता शिवाजीनगर पाेलिस करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक चव्हाण, पोलिस हवालदार बेस्के यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना मुद्देमालासह बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात लातूर येथील कनिष्ठ दूरसंचार अभियंता संगीता महेश कब्बुर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं. ६१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ६२, ३२४ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहराच्या मुख्य भागात अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली असून, या टोळीने आणखी कुठे हात साफ केला आहे का? याचा तपास आता पोलिस यंत्रणा करीत आहे.

Web Title : लातूर में दिल्ली का 'केबल गिरोह' गिरफ्तार, बीएसएनएल के केबल चोरी करते पकड़ा

Web Summary : लातूर पुलिस ने बीएसएनएल के केबल चोरी करने वाले दिल्ली के गिरोह का भंडाफोड़ किया। तीन संदिग्धों को 2.5 लाख रुपये के उपकरणों के साथ रंगे हाथों पकड़ा गया। अन्य संभावित चोरियों के लिए जांच जारी।

Web Title : Delhi's 'Cable Gang' Arrested in Latur Stealing BSNL Cables

Web Summary : Latur police busted a Delhi-based gang stealing BSNL cables. Three suspects were caught red-handed with ₹2.5 lakhs worth of equipment. They are under investigation for other potential thefts.