शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:26 IST

देशभरात लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन मूल्यमापनात अव्वल ठरली.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१९ राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक

लातूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनात लातूर मनपा देशात अव्वल ठरली असून, राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामधून झालेल्या मूल्यांकनात सदर पारितोषिक मिळाले आहे.

केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत असलेल्या केंद्रीय पथकाने लातूर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात लातूर मनपा अव्वल ठरली. सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची विल्हेवाट लावण्यात लातूर मनपाला यश आले असून, प्रभाग क्र. ५, १८ तसेच शासकीय कॉलनी, फ्रुट मार्केट, विवेकानंद चौक, भाजीपाला मार्केट या ठिकाणी ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. त्याचबरोबर शासकीय कॉलनी येथे सुका कचऱ्याच्या विघटीकरणाचा प्रकल्प उभारला आहे. वरवंटी येथील कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग असून, तेथे दररोज हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मोठी यंत्रणा उभी केली आहे. शहरातील सार्वजनिक भिंती रंगविणे, रात्रझडवई, १०० टक्के घंटागाडीद्वारे कचरा संकलन लातूर मनपाने अत्यंत चोख पद्धतीने केले आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये पहिल्यांदा लातूर मनपाने ओला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.

टाकाऊ प्लास्टिकपासून डांबरी रस्ता विकसीत करण्यात आला असून, सॅनिटरी नॅपकीनवरही प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. या प्रभागात जवळपास २० कुटुंब घरातच कचरा कुजवून खत बनवितात. कन्हैना नागरी सोसायटीत आणि भाजीपाला मार्केट येथेही तिसरा खत प्रकल्प उभारला आहे. या सर्व कामाचे मूल्यमापन केंद्रीय पथकाकडून झाले असून, त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. मात्र कोणत्या गटात पारितोषिक लातूर मनपाला मिळाले हे बुधवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले असून, त्यात कचरा व्यवस्थापनात लातूर मनपाला राष्ट्रीय स्तरावरील देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, सहायक आयुक्त वसुधा फड, सतीश शिवणे यांच्या नेतृत्वाखाली सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळाले आहे. 

राष्ट्रीयस्तरावरील सन्मान...लातूर शहरामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक पथदिवे बसवून शहर उजळविले असून, सुका कचरा वर्गीकरण केंद्राची उभारणी तसेच शहरात पाच ठिकाणी खत प्रकल्प उभारले गेले. या खत प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांनी तसेच नर्सरी चालकांनी खतत विकत घेतला आहे. त्याचा मनपाला आर्थिक फायदा झाला आहे. विशेष म्हणजे कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिग पडलेला होता. त्या ठिकाणी दररोज हजार टन प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारल्याने ढिग जमिनी स्तरावर आला आहे. याच कामाला राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgovernment schemeसरकारी योजनाlaturलातूर