लातूर : नुकत्याच पार पडलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सभागृहाचे चित्र स्पष्ट झाले असून, यंदा अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवकांची मोठी फळी सभागृहात पाहायला मिळणार आहे. एकूण ७० सदस्यांपैकी १९ नगरसेवक अनुभवी असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नव्या सदस्यांना आणि शहराच्या विकासाला होणार आहे.
सभागृहात सर्वाधिक अनुभव असलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे माजी महापौर ॲड. दीपक सूळ आणि भाजपचे रविशंकर जाधव यांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी विजयाची 'पंचक' साजरी केली असून, त्यांची ही पाचवी टर्म आहे. महापालिकेचे कायदे-कानून आणि प्रशासकीय कामकाजावर त्यांची मोठी पकड आहे.
अनुभवी सदस्यांची फळी..!केवळ ५ टर्मच नव्हे, तर अनेक सदस्य सलग तिसऱ्या आणि चौथ्यांदा निवडून आले आहेत. अहमदखा पठाण, गिरीश पाटील आणि देविदास काळे यांनी चौथ्यांदा सभागृहात प्रवेश केला आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे (राष्ट्रवादी), सपना किसवे (काँग्रेस) हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
सातत्य आणि अभ्यासू वृत्ती..!दीपक सूळ, रविशंकर जाधव, देविदास काळे, अहमदखा पठाण, सपना किसवे आणि विक्रांत गोजमगुंडे हे असे चेहरे आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामात खंड पडू दिला नाही. सातत्याने जनतेचा विश्वास संपादन करत त्यांनी आपली जागा कायम राखली आहे. ७० पैकी १७ नगरसेवक अनुभवी असल्याने, महापालिकेच्या चर्चेचा स्तर उंचावण्यास मदत होईल. नवीन निवडून आलेल्या सदस्यांना कामकाजाचे धडे गिरवण्यासाठी या दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.
यांना पुन्हा मिळाली सभागृहात जाण्याची संधी...!ॲड. दीपक सुळ, रविशंकर जाधव, देविदास काळे, अहमदखा पठाण, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, विक्रांत गोजमगुंडे, ज्योती आवासकर, सपना किसने, कांचन आजनीकर, विकास वाघमारे, रागिनी यादव, पप्पू देशमुख, कमल सोमवंशी, स्वाती घोरपडे, रविशंकर जाधव, दीपक मठपती, शितल मालू, शोभा पाटील हे पुन्हा सभागृहात पोहोचले आहेत.
Web Summary : Latur's newly elected municipal corporation boasts 19 experienced members among 70, including veterans like Deepak Sul and Ravishankar Jadhav. Their expertise promises better governance and guidance for new members, enhancing the corporation's discussions and developmental efforts.
Web Summary : लातूर नगर निगम में 70 सदस्यों में से 19 अनुभवी सदस्य हैं, जिनमें दीपक सुळ और रविशंकर जाधव जैसे दिग्गज शामिल हैं। उनका अनुभव नए सदस्यों के लिए मार्गदर्शन और बेहतर शासन का वादा करता है, जिससे निगम की चर्चा और विकासात्मक प्रयास बढ़ेंगे।