शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:00 IST

बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे.

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस व भाजपने १५ दिवसांपूर्वीच प्रभागनिहाय इच्छुकांचे अर्ज घेतले. भाजपने तर दोन दिवसांपूर्वीच मुलाखतीही उरकल्या. बुधवार व गुरुवार दोन दिवस काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. ज्यांनी मुलाखती दिल्या, त्यांच्यापैकीच एखाद्याला तिकीट मिळेल की ऐनवेळी मुलाखत न देताही वर्णी लागेल, याची चर्चा हाेत असून, जाेरदार रस्सीखेच सुरु आहे.

मनपाच्या ७० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पुढील चार दिवसांत उमेदवार निश्चित करणे सर्वच प्रमुख पक्षांसमोर आव्हान आहे. बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे. निवडणुकीपूर्वीच लातूर शहरात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पक्षांतरेही वाढली आहेत. कोण कुठल्या पक्षात जाणार, तिकीट मिळाले तर, नाही मिळाले तर अशी जर-तरची गणिते मांडून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारांच्या भेटीबरोबर नेत्यांशी संपर्क वाढविण्यात इच्छुकांचा दिवस जात आहे.

काँग्रेस, भाजपकडे ओढा...इच्छुक उमेदवारांची संख्या भाजप व काँग्रेसकडे सर्वाधिक आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी, आप, एमआयएमसह इतर पक्षांचीही तयारी दिसून येत आहे. सर्वांनीच उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर वाढविला आहे. बुधवारी दिवसभर काँग्रेस भवनसमोर कार्यकर्त्यांची गर्दी होती. जवळपास ५० टक्के इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उर्वरित मुलाखती गुरुवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्ज दिला, छाननी झाली, नाव कोणाचे?महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे. एका-एका प्रभागात एका जागेसाठी पाच ते दहा जणांनी दावा केला आहे. त्यामुळे नेत्यांना उमेदवार देत असताना कसरत करावी लागत आहे. ज्यांनी पक्षाकडे रितसर शुल्क भरून अर्ज दिला, ज्यांनी मुलाखत दिली, त्यांनाच उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल की, ऐनवेळी कोणी तरी वजनदार म्हणून ‘चर्चित चेहरा’ म्हणून तिकीट घेऊन जाईल की काय, अशी भीतीही उमेदवारांना आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Elections: Congress, BJP Interview Candidates Amid Ticket Race

Web Summary : Latur's municipal elections see parties vying for candidates. Congress and BJP interviewed hopefuls. Intense competition persists for the 70 seats as parties strategize to avoid rebellion and select strong contenders. Partisan shifts are also increasing.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसBJPभाजपा