Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:40 IST2025-12-03T16:40:19+5:302025-12-03T16:40:41+5:30
पाटोदा बु. येथून जळकोटकडे जात असताना झाला अपघात

Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू
जळकोट : तालुक्यातील पाटोदा बु. येथून जळकोटकडे जात असताना मोटारसायकवरील ताबा सुटल्याने पुलाला धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पाटोदा बु. येथून जळकोटकडे जात असताना मोटारसायकवरील रामेश्वर माधव गोरखे (वय वर्षे २४ रा. पाटोदा बु.), गिरिष बालाजी कांबळे (वय २६ वर्ष, रा. नळेगाव) हे पाटोदा बु. जवळील पुलाला मोटारसायकवरील ताबा सुटल्याने धडकले. यात गिरिष कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. तर रामेश्वर गोरखे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण हे करत आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.