दारूचं व्यसन अन् रोजची भांडणं! लातूरमध्ये झटापटीत पतीचा मृत्यू; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:37 IST2026-03-05T13:37:11+5:302026-03-05T13:37:33+5:30

कौटुंबिक वादातून पतीचा करुण अंत; पत्नीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Latur: Husband Dies During Domestic Altercation; Wife Arrested for Culpable Homicide by Shivaji Nagar Police | दारूचं व्यसन अन् रोजची भांडणं! लातूरमध्ये झटापटीत पतीचा मृत्यू; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

दारूचं व्यसन अन् रोजची भांडणं! लातूरमध्ये झटापटीत पतीचा मृत्यू; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

लातूर : कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीमध्ये पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात मयताच्या पत्नीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

पाेलिसांनी सांगितले, सिकंदर सिद्राम राठोड (वय ४९, रा. कन्हेरी तांडा, नाईक चौक, लातूर) यांना दारूचे व्यसन होते. या कारणावरून त्यांचे पत्नी कमलबाई यांच्याशी सतत वाद होत असत. मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सिकंदर हे दारू पिऊन घरी आले असता, पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर झटापटीमध्ये झाले. यादरम्यान सिकंदर हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस गंभीर दुखापत झाली. तसेच छातीवर मुका मार लागला. यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. कमलबाई यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

याबाबात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुरनं. ९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस.एन. चव्हाण हे करत आहेत. पाेलिसांनी तातडीने पत्नीला ताब्यात घेतले आहे.

Web Title : शराब, रोज के झगड़े से पति की मौत; पत्नी गिरफ्तार

Web Summary : लातूर में शराब के कारण हुए झगड़े में पति की मौत हो गई। पत्नी गिरफ्तार, गैर इरादतन हत्या का आरोप। लगातार बहस घातक चोटों में बदल गई। घटना 3 मार्च, 2026 को हुई, पुलिस जांच जारी है।

Web Title : Drunkenness, Daily Quarrels Led to Husband's Death; Wife Arrested

Web Summary : In Latur, a husband died during a fight fueled by his drinking habit. His wife was arrested, facing culpable homicide charges. Constant arguments escalated, resulting in fatal injuries. The incident occurred on March 3, 2026, and is under police investigation.