बाप 'खलनायक' वाटला अन् मुलाने नव्या घरातच त्यांचं रक्त सांडलं; 'असे' का घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:03 IST2026-02-05T12:02:17+5:302026-02-05T12:03:40+5:30

आयकर अधिकारी पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला पोलीस कोठडी

Latur Crime: Father becomes 'villain' in son's eyes; Son who killed father, Income Tax officer, remanded in police custody for 3 days | बाप 'खलनायक' वाटला अन् मुलाने नव्या घरातच त्यांचं रक्त सांडलं; 'असे' का घडलं?

बाप 'खलनायक' वाटला अन् मुलाने नव्या घरातच त्यांचं रक्त सांडलं; 'असे' का घडलं?

लातूर : ‘आईच्या औषधाेपचारासाठी पैसे का देत नाही? आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत पोटच्या २९ वर्षीय मुलाने आयकर विभागात अधिकारी असलेल्या जन्मदात्याचा गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही घटना खोपेगाव (ता. लातूर) येथे मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, पाेलिसांनी अटक केलेल्या आराेपी मुलाला बुधवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली.

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील आयकर अधिकारी कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) आणि मोठा मुलगा शंतनू (२९) यांच्यात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. शंतनूची आई आजारी असल्याने तिने औषधोपचारासाठी पैशांची मागणी केली. दरम्यान, आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. हे भांडण सुरू असताना कृष्णकुमार यांनी मुलगा शंतनू याला थापडा मारल्या. शिवाय, वृद्ध आजाेबा यांनीही त्याला ढकलून दिले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यातूनच मुलाने रागाच्या भरात ‘तुम्ही आईच्या उपचारासाठी पैसे का देत नाही?, आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत घरातील भाजी कापण्याचा चाकू आणला अन् थेट वडिलांच्या मानेवर जबर वार केले. यामध्ये कृष्णकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आराेपी मुलगा शंतनू याला पाेलिसांनी अटक केली. घटनास्थळावरून चाकू जप्त केला आहे. लातूर न्यायालयात बुधवारी दुपारी हजर केले असता, न्यालयालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

दाेन महिन्यांपूर्वीच झाली घराची वास्तूशांती
खाेपेगाव पाटी परिसरात कृष्णकुमार सन्मुखराव यांनी दाेन महिन्यांपूर्वीच नव्या घराचे बांधकाम पूर्ण केले हाेते. दरम्यान, वास्तूशांतीचा कार्यक्रमही थाटात केला हाेता. या घरामध्ये वृद्ध वडील, पती-पत्नी, दाेन मुले असे पाच जणांचे वास्तव्य हाेते. मात्र, मंगळवारी सकाळी झालेल्या क्षुल्लक वादातून मुलाने त्यांचा जीव घेतला.

किरकाेळ कारणावरून सतत हाेत असत भांडणे
सन्मुखराव दाम्पत्यामध्ये मुलांनी काहीतरी कामधंदा करावा, या कारणावरून सतत वाद हाेत असत. यावेळी आईकडून मुलांची बाजू घेतली जात हाेती. दरम्यान, यातूनच मुलांच्या मनात कर्तव्यकठाेर असलेल्या वडिलांबाबत द्वेष निर्माण हाेत हाेता. याच द्वेषातून वडील खलनायक ठरत गेले आणि माेठा मुलगा शंतनू याने त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

Web Title : बेटे ने पैसों के विवाद में नए घर में पिता की हत्या की

Web Summary : लातूर में, एक बेटे ने अपनी माँ के इलाज के लिए पैसों को लेकर विवाद के बाद अपने पिता, जो आयकर अधिकारी थे, की हत्या कर दी। बेटे को लगता था कि उसके पिता पर्याप्त सहायता नहीं कर रहे हैं। उसे गिरफ्तार कर लिया गया है और वह पुलिस हिरासत में है।

Web Title : Son Kills Father in New Home Over Money Dispute

Web Summary : In Latur, a son fatally stabbed his father, an income tax officer, after an argument about money for his mother's medical treatment. The son felt his father wasn't providing enough support. He has been arrested and is in police custody.