सीसीटीव्ही नसला तरी परीक्षा केंद्रावर 'झूम'ची नजर; लातूर बोर्डाचा कॉपी बहाद्दरांना झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:41 IST2026-02-28T11:41:13+5:302026-02-28T11:41:29+5:30

कॉपी बहाद्दरा सावधान! सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवर 'झूम लिंक'चा वॉच; लातूर विभागीय मंडळाची कॉपीमुक्तीसाठी मोठी पावले

Latur Board Exam: No CCTV? No Problem! Latur Education Board Monitors SSC Exams via Zoom Links | सीसीटीव्ही नसला तरी परीक्षा केंद्रावर 'झूम'ची नजर; लातूर बोर्डाचा कॉपी बहाद्दरांना झटका!

सीसीटीव्ही नसला तरी परीक्षा केंद्रावर 'झूम'ची नजर; लातूर बोर्डाचा कॉपी बहाद्दरांना झटका!

लातूर :दहावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने तंत्रज्ञानाचा नवा प्रयोग हाती घेतला आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तिथे आता 'झूम लिंक' द्वारे थेट लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या शाळेत कॅमेरे नाहीत, तिथे पेपर रनरच तीन तास कॅमेऱ्याद्वारे वॉच ठेवत असल्याने कॉपी बहाद्दरांना आळा बसला आहे.

लातूर विभागीय मंडळात दहावीचे जवळपास १ लाख १० हजार ९८३ विद्यार्थी ४१९ परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत. यातील जवळपास ७६ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले नव्हते. २० फेब्रुवारीनंतरही नांदेडमधील अनेक केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती परीक्षा मंडळाकडून देण्यात आली. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार बहुतांश शाळांनी सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र, अद्यापही काही केंद्रांवर ही सुविधा नाही.

दहावीच्या परीक्षा केंद्रांची स्थिती
जिल्हा - एकूण केंद्र - सीसीटीव्ही नसलेली केंद्रे

लातूर - १५२ - १२
नांदेड - १७८ - ४७
धाराशिव - ८९ - १७

उदगीरमध्ये १ कॉपी प्रकरण...
शुक्रवारी दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. शिक्षण विभागाने कॉपीमुक्तीसाठी कडक पावले उचलली असली तरी काही ठिकाणी कॉपीचे प्रयत्न सुरू आहेत. उदगीर तालुक्यातील राजर्षी शाहू विद्यालयात एक कॉपी प्रकरण उघडकीस आले. तसेच नांदेड जिल्ह्यातही दोन ठिकाणी कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथके आणि झूम लिंकच्या माध्यमातून ही पाळत ठेवली जात आहे.

संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख
ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा केंद्रांवर बाह्य पर्यवेक्षक यंत्रणेसह झूम लिंकद्वारे लक्ष ठेवले जात आहे. ही लिंक आमच्या वॉर रूमशी कनेक्ट असून तिथून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख केली जाते.
- अनुपमा भंडारी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, लातूर

Web Title : सीसीटीवी के बिना लातूर बोर्ड ने परीक्षा केंद्रों पर 'ज़ूम' से निगरानी रखी।

Web Summary : लातूर बोर्ड ने दसवीं की परीक्षा में नकल रोकने के लिए सीसीटीवी के बिना केंद्रों पर ज़ूम का उपयोग किया। पेपर रनर ज़ूम से निगरानी रखते हैं, जिससे कदाचार रुकता है। पहले 76 केंद्रों पर सीसीटीवी नहीं थे; अब, ज़ूम लिंक से निगरानी की जा रही है, जिसकी देखरेख एक केंद्रीय वॉर रूम से होती है।

Web Title : Latur Board uses Zoom to monitor exam centers without CCTV.

Web Summary : Latur board innovatively uses Zoom in centers lacking CCTV to curb cheating during tenth-grade exams. Paper runners monitor via Zoom, deterring malpractice. Over 76 centers previously lacked CCTV; now, Zoom links provide surveillance, overseen from a central war room.