नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठले; कार ट्रकखाली घुसली, महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:25 IST2026-03-05T16:20:08+5:302026-03-05T16:25:06+5:30

जळकोट हादरले! भरधाव कारचा उभ्या ट्रकला भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

Latur Accident: Tragic! Time passed while going to a relative's funeral; Car crashed under a truck, a woman died, three injured | नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठले; कार ट्रकखाली घुसली, महिलेचा जागीच मृत्यू

नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठले; कार ट्रकखाली घुसली, महिलेचा जागीच मृत्यू

जळकोट (जि. लातूर) : एकीकडे नातेवाईकाच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे काळाने घातलेला घाला, अशा हृदयद्रावक घटनेने जळकोट शहर हादरले आहे. अंत्यविधीसाठी नांदेड येथून कर्नाटककडे जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जळकोट शहरातील महात्मा फुले चौकामध्ये घडला.

पाेलिसांनी सांगितले, नांदेड येथील सूर्यवंशी कुटुंबीय आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कर्नाटक राज्यातील डोणगाव (ता. कमलनगर जि. बीदर) येथे कारने (एम.एच. १२ एफ ०२९९) निघाले होते. ही कार जळकोट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात उदगीरच्या दिशेने जात होती. याच दरम्यान, महामार्गावरील महात्मा फुले चौकाजवळ एका ट्रकचे (एम.एच. २६ ए.डी. ०३३३) टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उभ्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकली. धडक एवढी भीषण होती की, कारचा चक्काचूर होऊन ती ट्रकच्या खाली घुसली.

अपघातात जखमी महिलेचा जागीच मृत्यू
अपघातात ध्रुपताबाई सूर्यवंशी (रा. नांदेड) यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर कारमधील इतर प्रवासी बस्वराज सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी आणि वर्षा म्हेत्रे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना कारबाहेर काढले.

प्रकृती चिंताजनक; लातूरला हलवले
जखमींना तातडीने उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना लातूर येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणी
जळकोट शहरातील या चौकात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. अपघाताच्या भीषणतेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. तपास पोलिस निरीक्षक माचेवाड यांच्यासह सहकारी तपास करत असून, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title : मातम में बदली त्रासदी: अंतिम संस्कार के लिए जा रही कार दुर्घटनाग्रस्त, महिला की मौत

Web Summary : कर्नाटक में एक रिश्तेदार के अंतिम संस्कार में जा रहा एक परिवार जलकोट के पास त्रासदी का शिकार हो गया। उनकी कार एक खड़े ट्रक से टकरा गई, जिससे एक महिला की मौत हो गई और तीन अन्य गंभीर रूप से घायल हो गए। दुर्घटना ट्रक पर ओवरस्पीडिंग और टायर फटने के कारण हुई। स्थानीय लोगों ने स्पीड ब्रेकर लगाने की मांग की।

Web Title : Grief Turns to Tragedy: Car Crash Kills Woman En Route to Funeral

Web Summary : A family traveling to a relative's funeral in Karnataka met with tragedy near Jalkot. Their car crashed into a stationary truck, killing a woman and seriously injuring three others. The accident occurred due to overspeeding and a burst tire on the truck. Locals demand speed bumps.