शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:50 IST

लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; जळकोट तहसीलमध्ये फाईल बंद करण्यासाठी मागितली लाच.

लातूर: जळकोट तहसील कार्यालयातील ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत कार्यरत असलेल्या एका माजी कंत्राटी संगणक ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. स्वतःचा प्रभाव पाडून तहसील कार्यालयातील फाईल कायमची बंद करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे जळकोट तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजय लद्दे असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, लातूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे.

फाईल बंद करण्यासाठी पैशांची मागणीमिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध जळकोट पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होती. या प्रकरणाची फाईल तालुका दंडाधिकारी कार्यालयातून कायमची बंद करण्यासाठी आणि पुढील तारखांना हजेरीतून सूट मिळवून देण्यासाठी आरोपी अजय लद्दे याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १ हजार रुपये घेण्याचे त्याने मान्य केले होते.

एसीबीचा सापळा आणि नाट्यमय घडामोडयाप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर २४ मार्च २०२६ रोजी जळकोटमध्ये सापळा रचण्यात आला होता. मात्र, पैसे स्वीकारताना आरोपीला संशय आल्याने त्याने ऐनवेळी रक्कम घेण्यास नकार दिला. तरीही, एसीबीने केलेल्या पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या पुराव्यांच्या आधारे शुक्रवारी २७ मार्च रोजी जळकोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घराची झडती आणि पुढील तपास सुरूही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूरचे पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश राऊत व त्यांच्या पथकाने केली. सध्या आरोपीच्या घराची झडती आणि त्याचा मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Computer Operator Demanding Bribe Caught; Commotion in Jalkot Tehsil

Web Summary : A former contract computer operator in Jalkot is booked for demanding a bribe to close a file. ACB laid a trap after receiving a complaint. The accused was arrested and investigation is underway.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागlaturलातूरRevenue Departmentमहसूल विभाग