लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:50 IST2026-03-28T12:49:19+5:302026-03-28T12:50:29+5:30

लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; जळकोट तहसीलमध्ये फाईल बंद करण्यासाठी मागितली लाच.

Latur ACB Trap: Computer operator who demanded bribe caught; Excitement at Jalkot Tehsil office | लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ

लाचेची मागणी करणारा संगणक ऑपरेटर ACB च्या जाळ्यात; जळकोट तहसीलमध्ये खळबळ

लातूर: जळकोट तहसील कार्यालयातील ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत कार्यरत असलेल्या एका माजी कंत्राटी संगणक ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. स्वतःचा प्रभाव पाडून तहसील कार्यालयातील फाईल कायमची बंद करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे जळकोट तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजय लद्दे असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून, लातूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे.

फाईल बंद करण्यासाठी पैशांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध जळकोट पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू होती. या प्रकरणाची फाईल तालुका दंडाधिकारी कार्यालयातून कायमची बंद करण्यासाठी आणि पुढील तारखांना हजेरीतून सूट मिळवून देण्यासाठी आरोपी अजय लद्दे याने २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १ हजार रुपये घेण्याचे त्याने मान्य केले होते.

एसीबीचा सापळा आणि नाट्यमय घडामोड
याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर २४ मार्च २०२६ रोजी जळकोटमध्ये सापळा रचण्यात आला होता. मात्र, पैसे स्वीकारताना आरोपीला संशय आल्याने त्याने ऐनवेळी रक्कम घेण्यास नकार दिला. तरीही, एसीबीने केलेल्या पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या पुराव्यांच्या आधारे शुक्रवारी २७ मार्च रोजी जळकोट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घराची झडती आणि पुढील तपास सुरू
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूरचे पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश राऊत व त्यांच्या पथकाने केली. सध्या आरोपीच्या घराची झडती आणि त्याचा मोबाईल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे.

Web Title : घूस मांगने वाला कंप्यूटर ऑपरेटर पकड़ा गया; जलकोट तहसील में खलबली

Web Summary : जलकोट में एक पूर्व अनुबंध कंप्यूटर ऑपरेटर को फाइल बंद करने के लिए घूस मांगने पर गिरफ्तार किया गया। एसीबी ने शिकायत मिलने के बाद जाल बिछाया। आरोपी गिरफ्तार, जांच जारी है।

Web Title : Computer Operator Demanding Bribe Caught; Commotion in Jalkot Tehsil

Web Summary : A former contract computer operator in Jalkot is booked for demanding a bribe to close a file. ACB laid a trap after receiving a complaint. The accused was arrested and investigation is underway.