Latur: केंद्रेवाडीतून ८ फुट लांब, १०० किलो वजनाची मगर पकडली; शेतकऱ्यांची धास्ती मिटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:43 IST2025-11-01T15:41:27+5:302025-11-01T15:43:04+5:30
दाेन दिवसांपासून शाेध संपला, वनाधिकाऱ्यांनी पकडली १०० किलोकही मगर

Latur: केंद्रेवाडीतून ८ फुट लांब, १०० किलो वजनाची मगर पकडली; शेतकऱ्यांची धास्ती मिटली
अंधोरी (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव, केंद्रेवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून मगर असल्याची चर्चा हाेती. ही मगर या परिसरातील काही शेतकऱ्याला दिसल्याने भीतीचे वातावरण हाेते. याची माहिती तातडीने वन परिमंडळ अधिकारी कार्यालय, अहमदपूर यांना कळविण्यात आली. वन विभागाच्या पथकाने दोन दिवसांपासून ढाळेगाव, अंधाेर आणि केंद्रेवाडी शिवारात शोधमोहीम राबविली. या माेहीमेला यश आले असून, केंद्रेवाडी शिवारात शुक्रवार, ३१ ऑक्टाेबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास १०० किलाे वजनाची मगर पकडण्यात आली.
ही मगर ८ फूट लांब आणि १०० किलो वजनाची असल्याचे सांगण्यात आले. या मगरीच्या दहशतीने परिसरातील अनेक शेतकरी जीव मुठीत धरून शेतशिवारात फिरत होते. मगर पकडल्याच्या वृत्ताने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शिवाय, भीती राहिले नाही असे शेतकऱ्यांतून बाेलले जात आहे. मगर पकडण्यासाठी अहमदपूर परिमंडळ अधिकारी केसाळे, वनरक्षक होनराव, वनरक्षक सर्व कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.