मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून

By राजकुमार जोंधळे | Updated: February 24, 2024 21:51 IST2024-02-24T21:51:29+5:302024-02-24T21:51:46+5:30

उदगीर येथील साखर कारखाना परिसरातील घटना...

killed a woman by stabbing her neck with a sharp weapon | मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून

मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून

राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : येथील साखर कारखाना परिसरात हंगरगा रस्त्यावरील एका घरामध्ये महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील साखर कारखाना परिसरात हंगरगा रोडवर सखुबाई तुळशीराम वाघमारे (वय ५५ ) ही शेतात वास्तव्याला हाेती. दरम्यान, शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने मानेवार वार करून तिचा अज्ञातांनी खून केल्याची घटना उघडकीस आली.

उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांनी घटना समजल्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. मयत महिलेची मुलगी शोभाबाई अशोक कांबळे यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

Web Title: killed a woman by stabbing her neck with a sharp weapon