शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स आहे. यापैकी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० ...

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स आहे. यापैकी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० हेक्टर्स आहे. ५ हजार हेक्टर्स बागायती जमीन असल्याने २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येते. यंदा पेरणीचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात. सोयाबीन नगदी पीक आहे आणि यावर्षी सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. परिणामी एकंदर लागवडी क्षेत्राच्या ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. सोयाबीनचा पेरा २३ हजार ३८५ हेक्टर्सवर होणार असून, त्यासाठी १७ हजार ६२५ क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यावर अवलंबून न राहता १३ हजार ५८८ क्विंटल घरगुती बियाण्याचा वापर करण्यात येणार आहे. केवळ ३०० क्विंटल बियाण्याची गरज बाजारपेठेतून भागविली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

२३ हजार ५०० हेक्टर्सवर सोयाबीन...

खरीप हंगामाच्या कृती आराखड्यातील २८ हजार ३८५ हेक्टर्सपैकी २३ हजार ५०० हेक्टर्सवर सोयाबीनचा पेरा करण्यात येणार आहे. उर्वरित ३ हजार ७५० हेक्टर्सवर तुर, तसेच ३३० हेक्टर्सवर उडीद, २१० हेक्टर्सवर मूग आणि १७५ हेक्टर्सवर हायब्रीड ज्वारीची पेरणी करण्यात येणार आहे.

३ हजार ४३९ मॅट्रिक टन खते उपलब्ध...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीसाठी रासायनिक खतांची गरज लक्षात घेऊन तालुका कृषी कार्यालयाकडून खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी ३ हजार ४३९ मॅट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध करण्यात आली आहेत. उर्वरित खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.