जुन्या भांडणाची कुरापत काढून कत्तीने तरुणावर केले वार 

By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2022 18:42 IST2022-09-03T18:42:26+5:302022-09-03T18:42:39+5:30

औसा राेडवरील घटनेत तिघांविराेधात गुन्हा..

Katti stabbed the young man with a knife to make up for an old quarrel | जुन्या भांडणाची कुरापत काढून कत्तीने तरुणावर केले वार 

जुन्या भांडणाची कुरापत काढून कत्तीने तरुणावर केले वार 

लातूर : शहरातील औसा राेड परिसरात पुन्हा राडा करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. चार दिवसांपूर्वीच असाच राडा नंदी स्टाॅप परिसरात झाला हाेता. दरम्यान, एका २० वर्षीय तरुणावर मागील भांडणाचा राग मनात ठेवत तिघांनी कत्ती, चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये ताे तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, धीरज उर्फ बबलू अर्जुन साेनकांबळे (वय २० रा. गायत्री नगर, लातूर) आणि प्रशांत कांबळे व त्याच्या मित्रासाेबत (सर्व रा. विठ्ठल नगर, लातूर) वाद झाला हाेता. दाेन आठवड्यापूर्वीच्य भांडणाचा राग मनात ठेवत प्रशांत कांबळे आणि त्याच्या दाेघा साथीदारांनी धिरज साेनकांबळे याच्यावर हल्ला केला. यावेळी धीरजने त्यांच्या हातातील धारदार कत्तीने पाठी कमेरेच्यावर दोन ते तीन वार केले. त्याचबराेबर त्यांच्या साेबतच्या एका साथीदाराने त्याच्या जवळील चाकूने बरगडीजवळ वार करुन गंभीर जखमी केले. तर तिसऱ्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली. 

याबाबत जखमी धीरज साेनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक राठाेड करत आहेत.

Web Title: Katti stabbed the young man with a knife to make up for an old quarrel