३४ वार करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कोर्टानं सुनावला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 20:42 IST2026-03-27T20:42:46+5:302026-03-27T20:42:46+5:30

या भीषण हल्ल्यामध्ये रेशमा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील याकूब शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले हाेती.

In Latur, Man sentenced to life imprisonment for brutally murdering wife by stabbing her 34 times; Court announces verdict | ३४ वार करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कोर्टानं सुनावला निकाल

३४ वार करून पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप; कोर्टानं सुनावला निकाल

राजकुमार जाेंधळे

लातूर : पत्नीच्या शरीरावर ३४ वार करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी आजन्म कारावास आणि १० हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. अब्दुल युनूस शेख असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष वसंतराव देशपांडे यांनी सांगितले, ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० वाजेच्या सुमारास लातूर शहरातील अवंतीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपी अब्दुल युनूस शेख याने आपली पत्नी रेशमा हिच्यावर घरातील धारदार बतईने एकामागून एक ३४ वार केले हाेते. या भीषण हल्ल्यामध्ये रेशमा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील याकूब शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले हाेती.

यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांनी केला. त्यांनी घटनेचा पंचनामा, हत्यार जप्ती आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून न्यायालयात सबळ दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आजन्म कारावास (जन्मठेप), दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भाेगावा लागणार आहे.

सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष वसंतराव देशपांडे यांनी न्यायालात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना तपास अधिकारी राष्ट्रपाल लोखंडे, समन्वयक आर. टी. राठोड, पोलिस हेड कॉन्स्टेबल बी.टी. हिंगडे, त्याचबराेबर ॲड. एम.के. बिरीकर आणि दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.

 

Web Title : पत्नी की 34 वार कर हत्या करने वाले पति को आजीवन कारावास।

Web Summary : लातूर में अब्दुल यूनुस शेख को पत्नी रेशमा की हत्या के लिए आजीवन कारावास और जुर्माना हुआ। मामूली विवाद के बाद उसने 34 वार किए। अदालत ने सबूतों और गवाहों के आधार पर दोषी ठहराया।

Web Title : Husband gets life sentence for brutally murdering wife with 34 wounds.

Web Summary : Abdul Yunus Sheikh received life imprisonment and a fine for murdering his wife, Reshma, in Latur. He inflicted 34 wounds following a minor dispute. The court convicted him based on evidence and witness testimony.