कारने थांबलेल्या दुचाकीला उडविले; दोघे गंभीर जखमी, औसा तालुक्यातील टेंबीनजीक अपघात
By राजकुमार जोंधळे | Updated: June 5, 2025 00:06 IST2025-06-05T00:06:16+5:302025-06-05T00:06:28+5:30
दोघांवरही लातूर येथे उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

कारने थांबलेल्या दुचाकीला उडविले; दोघे गंभीर जखमी, औसा तालुक्यातील टेंबीनजीक अपघात
राजकुमार जाेंधळे
औसा (जि. लातूर) : भरधाव कारने थांबलेल्या दुचाकीस्वाराला जाेराने उडवल्याची घटना बुधवारी रात्री ७ वाजता टेंबी गावानजीक घडली. यामध्ये दाेघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औशात प्रथमाेपचार करुन पुढील उपचारासाठी लातूरला हलवले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
औसा येथील अस्लम मुनीरअली सय्यद (वय ४०) आणि निजामोद्दीन युसूफ शेख हे दोघे दुचाकीवरुन (टी.जी.१२ ए. ४२०४) शिवली येथून औशाकडे येत होते. दरम्यान, वाटेत टेंबीनजीक ईदगाह येताच पाऊस आला. दाेघेही रस्त्यालगत थांबले हाेते. पाठीमागून भरधाव आलेल्या कारच्या (एम.एच १२ ई.एक्स. ५०७०) चालकाने दुचाकीला जाेराने उडवले. या अपघातता दुचाकीसह दोघेही लांबवर फरफट गेले. दुचाकीचे नुकसान झाले असून, अस्लम सय्यद यांच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागला. निजामोद्दीन शेख यांना मान, पाय, डोके, हाताला गंभीर दुखापत झाली. दोघांवरही लातूर येथे उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.