अवैध दारूची वाहतूक, कारसह दाेघांना पकडले; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: December 20, 2023 21:35 IST2023-12-20T21:34:52+5:302023-12-20T21:35:15+5:30
दाेघांविराेधात दाखल करण्यात आला गुन्हा

अवैध दारूची वाहतूक, कारसह दाेघांना पकडले; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
राजकुमार जाेंधळे, लातूर: चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या दाेघांना ताेंडारपाटी (ता. उदगीर) येथे बुधवारी अटक करण्यात आली. यावेळी कारसह ७२ लिटर दारू, कार असा एकूण चार लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. याबाबत दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गत १५ दिवसांत लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूवर छापा मारण्यात आला आहे. शिवाय, हातभट्टीनिर्मिती करणाऱ्या अड्ड्यावरही पथकाने छापा मारला आहे. यावेळी लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उदगीर तालुक्यात ताेंडारपाटी परिसरात एका कारमधून अवैध दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती उदगीर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून ताेंडारपाटी येथे ही कार पकडली. यावेळी कारमध्ये असलेली ७२ लिटर दारू जप्त केली असून, दाेघांना अटक केली आहे. ही कारवाई उदगीर विभागाचे आर. एम. चाटे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, गणेश गाेले, नीलेश गुणाले, ज्याेतीराम पवार, एस. जी. बागेलवाड, संताेष केंद्रे, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.