चाकूर : एक तरुण पाठलाग करुन त्रास देत असल्याने महाविद्यालयीन मुलीने गुरुवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चाकूर पोलिस ठाणेअंतर्गत तळणी(ता.रेणापूर) येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तळणी येथील राहूल गायकवाड यांची सतरा वर्षिय मुलगी रेणापूर येथील श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोनामुळे ती महाविद्यालयात अधूनमधून जात होती. तळणी येथील ईश्वर बाबू कन्हेरे हा 'माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस, मला बोलत जा' असे म्हणून वाईट हेतूने पाठलाग करत असे. हा प्रकार मुळे आई-वडील यांना सांगितला होता. तेव्हा राहूल गायकवाड व अजय इंगावले यांनी ईश्वर मुलीला त्रास देऊ नको असे समजावले. दरम्यान, २४ मार्च रोजी मुलगी व तिची आई शेतातून सायंकाळी सहाच्या सुमारास घराकडे येत होते. तेच्छा ईश्वर व गावातील अन्य एकजण त्यांच्या रस्त्यावर थांबले होते. मुलीने याची माहिती आईला दिली. यावरून त्यांनी ईश्वरला तू इकडे कशाला आलास, तुझे काय काम आहे ? असा जाब विचारला. यावर ईश्वरने मी काहीही करेन, तुमचं तुम्ही बघा असे म्हणून निघून गेला. यानंतर रात्री आठच्या सुमारास राहूल गायकवाड यांनी पुन्हा एकदा ईश्वर यास मुलीस त्रास न देण्याबद्दल समज दिली. तेव्हा त्याने गायकवाड यांना धक्काबूक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या मुलीने पहाटे घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी राहुल गायकवाड यांनी ईश्वर याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यावरून ईश्वर कन्हेरे याचे विरुध्द गुरंन ११० / २१ कलम ३०६, ३५४डी,३२३,५०६,बालकांचे लैगींक अपराधापासून संरक्षण अधिनियम ११(४),१२,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९,३(१) (एस),३(२),३(व्ही)३(२) (व्ही ए),३(१) (डब्लू) (आय)नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ईश्वर कन्हेरे याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे यांनी दिली.