शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद मुक्ती लढा धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

लातूर : हैदराबाद मुक्ती लढ्यातील सर्वच स्वातंत्र्यसेनानी म्हणजे धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिकाच होती. मूळचे उदगीर येथील असलेले हणमंतराव केशव बेंडे ...

लातूर : हैदराबाद मुक्ती लढ्यातील सर्वच स्वातंत्र्यसेनानी म्हणजे धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिकाच होती. मूळचे उदगीर येथील असलेले हणमंतराव केशव बेंडे यांची शौर्य कथाही अशीच प्रेरणादायी आहे. निजाम राजवटीतील पोलिसांचा अतोनात छळ सहन करून न डगमगता स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची कथा आजही अंगावर शहारे आणणारी आहे. गुलामगिरीच्या जोखडातून सुटका करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. छळ सहन केला. यापैकीच एक नाव म्हणजे स्वातंत्र्यसेनानी हणमंतराव केशवराव बेंडे, मूळचे उदगीरचे. शालेय शिक्षणासाठी ते अंबाजोगाईला गेले. हैदराबाद मुक्ती लढ्याचे अंबाजोगाई माहेरघर. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे असे थोर व्यक्तिमत्त्व ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाच स्वातंत्र्याचा लढा लढत होते. शिक्षण घेत असताना या लढ्यात बेंडे यांनी स्वत:ला झोकून दिले. नववीच्या वर्गात शिकत असतानाच स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले. यामुळे त्यांना नऊ महिन्यांची शिक्षा झाली. ४२ च्या आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदविला. १९४७-४८ च्या लढ्यात त्यांनी झेप घेतली. लातूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे सत्याग्रह होणार असल्याची खबर पोलिसांना लागली. या सत्याग्रहात स्वातंत्र्यसेनानी बेंडे होते. त्यांना पोलिसांनी अटक करण्यासाठी व्यूहरचना आखली होती. मात्र पोलिसांचा पहारा चुकवून पूर आलेल्या दुधना नदीतून पसार झाले. जालना मार्गे देऊळगाव राजाला पोहोचले. देऊळगाव येथील शिबिरात सहभाग नोंदवून हैदराबाद लढ्यात पुन्हा जोमाने उतरले. कोरोडगिरी येथे झालेल्या आंदोलनात मोठी भूमिका निभावली. पटवाऱ्याचे दप्तर जाळून मालगुजारीची रक्कम हिसकावून आणली. परत देऊळगावकडे शिबिरात येताना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी पोलिसांकडून खूप छळ झाला. मात्र या छळाला न जुमानता हैदराबाद मुक्ती लढा त्यांनी यशस्वी केला. हैदराबाद मुक्ती लढ्यातील हणमंतराव बेंडे पेटत्या मशालीप्रमाणे धगधगते व्यक्तिमत्त्व होते. १९४९ नंतर मात्र त्यांनी निती निकेतन शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा वृत्तीने काम करून आगळेवेगळे स्थान निर्माण केले. असे हे व्यक्तिमत्त्व १६ डिसेंबर २००५ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी अनंतात विलीन झाले.