शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालाय इमारत उभारली, मात्र रिक्त पदाचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

उदगीर, अहमदपूर, चाकूर व जळकोट या चार तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. या चार तालुक्यांच्या ...

उदगीर, अहमदपूर, चाकूर व जळकोट या चार तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. या चार तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण तर रविवारी आठवडी बाजार दिवशी १५० ते २०० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रावर रुग्णांचा भार आहे. यांची दखल घेऊन मोडकळीस व कालबाह्य झालेली इमारत पाडून नवीन देखणी इमारत आरोग्य विभागाकडून उभारण्यात आली; पण आता आरोग्य केंद्रात रिक्त असलेली पदे केव्हा भरणार? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हाळी, हंडरगुळी, वाढवणा खु. व तोंडार ही चार उपकेंद्रे असून कार्यक्षेत्रातील गावासह कार्यक्षेत्राबाहेरील गावातील रुग्णही येथे आरोग्य तपासणीसाठी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणे गरजेचे आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आजाराची थोडीही चाहूल लागताच नागरिक तपासणीसाठी दवाखान्यात दाखल होत आहेत. आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असून, रिक्त पदांविषयी वरिष्ठांना कळवले आहे, असे हंडरगुळी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत गजाई यांनी सांगितले.

रुग्णालयातील कर्मचारीसंख्या...

हंडरगुळी येथील आराेग्य केंद्रात सध्याला वैद्यकीय अधिकारी - मंजूर पदे ०२, भरलेली पदे ०२, रिक्त पदे ००, आरोग्य सहायक (पुरुष) - मंजूर पदे १, भरलेली पदे ०१, रिक्त पदे ००, आरोग्य सहायक (स्त्री) - मंजूर पदे ०१, भरलेली पदे ०१, रिक्त पदे ००, औषध निर्माण अधिकारी - मंजूर पदे ०१, भरलेली पदे ००, रिक्त पदे ०१, आरोग्य सेवक - मंजूर पदे ०४, भरलेली पदे ०२, रिक्त पदे ०२, आरोग्य सहायक (पुरुष) - मंजूर पदे ०१, भरलेली पदे ०१, रिक्त पदे ०१, आरोग्य सेवक (महिला) - मंजूर पदे ०५ भरलेली पदे ०२, रिक्त पदे ०३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- मंजूर पदे ०१, भरलेली पदे ००, रिक्त पदे ०१ आहेत.