घरमालक गेले मुंबईला; अन् चोरट्यांनी घर फाेडले लातूरला !

By राजकुमार जोंधळे | Updated: May 27, 2023 17:54 IST2023-05-27T17:54:16+5:302023-05-27T17:54:29+5:30

चाेरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला.

Homeowners moved to Mumbai; And the thieves broke the house in Latur! | घरमालक गेले मुंबईला; अन् चोरट्यांनी घर फाेडले लातूरला !

घरमालक गेले मुंबईला; अन् चोरट्यांनी घर फाेडले लातूरला !

लातूर : घरमालक काही खासगी कामानिमित्त मुंबईला गेल्याची संधी साधत चाेरट्यांनी बंदघर फाेडून एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना औसा येथील याकतपूर राेड येथे २४ ते २५ मे राेजीच्या रात्री घडली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी महादेव हिराचंद जाधव (वय ३२, रा. नेलवाड, ता. निलंगा) यांनी औसा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीचे चुलते हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून काही खासगी कामानिमित्त मुंबईला गेले हाेते. दरम्यान, इकडे चाेरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवण्यात आलेली राेख ७० हजारांची राेकड आणि साेन्याचे दागिने, एक घड्याळ असा एकूण एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २४ ते २५ मे राेजीच्या रात्रीच्या सुमारास घडली, असे पाेलिसांनी सांगितले. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलिस नाईक डिगे करत आहेत.

 

Web Title: Homeowners moved to Mumbai; And the thieves broke the house in Latur!