चाकूर परिसरात ट्रकसह ३५ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:46+5:302020-12-30T04:26:46+5:30
पाेलिसांनी सांगितले, जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि. गजानन क्षीरसागर, सपाेउपनि. बालाजी आटरगे, पाेलीस नाईक बळवंत भोसले, ...

चाकूर परिसरात ट्रकसह ३५ लाखांचा गुटखा जप्त
पाेलिसांनी सांगितले, जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि. गजानन क्षीरसागर, सपाेउपनि. बालाजी आटरगे, पाेलीस नाईक बळवंत भोसले, दिनेश हावा, लक्ष्मण कांदे, प्रमोद मोरे, परमेश्वर अंकुलगे, भीमराव हासुळे, नंदकिशोर शेंडगे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी लातूररोड नजीक असलेल्या एका बारसमोर ट्रक एमएच १२ केपी ५०१५ थांबला हाेता. दरन्यान, सदरील ट्रकमधून चाेरट्या मार्गाने गुटाख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उभ्या ठाकलेल्या ट्रकवर पाेलीस पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास छापा मारला. ट्रकमध्ये गुटख्याने भरलेली ३० पोती आढळून आली. ताे मुद्देमाल २४ लाख ८४ हजार रुपयांचा असल्याचे पाेलिसांनी सांगितले. यावेळी पाेलीस पथकाने ट्रकसह गुटखा असा एकूण ३४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील यांनी चाकूर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश वैद्यनाथ चव्हाण (रा. भालकी, जि. बीदर), रौफ इनामदार (रा. केशर जवळगा, ता. उमरगा), ट्रकमालक रमेश माने (रा. पुणे), समीर शेख (रा. पुणे), जावेद पिराणी (रा. वसमत, जि. हिंगाेली) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील संगारेड्डी येथून या गुटख्याची वाहतूक वसमतच्या दिशेने केली जात असल्याचे पाेलिसांनी सांगितले. पोलिसांनी ट्रकचालक सुरेश चव्हाण आणि रौफ इनामदार यांना रात्री उशिरा अटक केली.