मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर; बदलाव लागली तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:50 PM2018-04-06T18:50:42+5:302018-04-06T19:08:12+5:30

तळेगाव ( बो ) येथील शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने मुलीच्या विवाहाची पुर्व तयारी रखडली असुन , जुळलेल्या रेशीम गाठी पैशाअभावी मोडण्याची वेळ आली आहे

gram selling makes hurdle in Girl's marriage, Changed date due to not started guaranteed price centre | मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर; बदलाव लागली तारीख

मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर; बदलाव लागली तारीख

Next
ठळक मुद्देतळेगाव ( बो ) शिवारात भागवत एकुर्गे यांची एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीन असुन , यंदा या शेतकऱ्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे . त्यामुळे हरभऱ्याची विक्री करून मुलीचा विवाह पार पाडायचा असा मनोदय करून  एकुर्गे यानी मुलीचा विवाह जुळविला

शिरूर अनंतपाळ (लातूर ) :  तालुक्यातील तळेगाव ( बो ) येथील शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने मुलीच्या विवाहाची पुर्व तयारी रखडली असुन , जुळलेल्या रेशीम गाठी पैशाअभावी मोडण्याची वेळ आली आहे .परिणामी मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर होत असल्याने सदर शेतकऱ्याने तात्काळ हमीभावाने हरभरा खरेदी करून रक्कम देण्यात यावी. अशी मागणी शुक्रवारी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे .

तालुक्यातील तळेगाव ( बो ) शिवारात भागवत एकुर्गे यांची एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीन असुन , यंदा या शेतकऱ्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे . त्यांच्या एकत्र कुटूंबातील जमीनत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले आहेत . त्यामुळे हरभऱ्याची विक्री करून मुलीचा विवाह पार पाडायचा असा मनोदय करून  एकुर्गे यानी मुलीचा विवाह जुळविला आणि २४ एप्रील ही विवाहाची तारीख काढली आहे .परंतु अद्यापि  हरभऱ्याची हमीभावात विक्री झाली नाही. त्यामुळे मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर होत आहे. एकुर्गे यानी हरभऱ्याची लवकर विक्री व्हावी यासाठी  आँनलाईन नोंदणी केली आहे .परंतु हरभरा हमीभाव भाव केंद्रावर अद्यापि खरेदी सुरू झाली नसल्याने एकुर्गे यांची मोठी अडचण झाली आहे . त्यामुळे एकुर्गे यानी जिल्हाधिकाऱ्यामार्फत थेट मुख्यमंत्रयास निवेदन देऊन तात्काळ हमीभावाने हरभरा खरेदी करावी अशी मागणी केली आहे .

विवाहाची तारीख बदलली
मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसराबाबत एकुर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बाजरपेठेत हरभरा विक्री केला तर जवळपास दिड लाखाचा तोटा सहन करावा लागत आहे .त्यामुळे हमीभावाने विक्री करावी. यासाठी विवाहाची २४ एप्रील ही तारीख बदलुुन  आता १२ मे तारीख  ठरविण्यात आली आहे . त्यामुळे आता तरी लवकरच लवकर हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यात यावी .असेही एकुर्गे यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: gram selling makes hurdle in Girl's marriage, Changed date due to not started guaranteed price centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.