शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासकीय कार्यालयांनाही २ टक्के टीडीएस वजावट बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:28 IST

सेवा किंवा वस्तू पुरवठा करणाऱ्यास पाच दिवसांच्या आत आॅनलाईन टीडीएस प्रमाणपत्र देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देअंमलबजावणी १ आॅक्टोबरपासून निवृत्त राज्य वस्तू व सेवाकर उपायुक्त गवंडी यांची माहिती

लातूर : केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यालये, स्थानिक प्राधिकरण, शासकीय अभिकरण (एजन्सी) शासनाच्या सहभागातून चालणारी मंडळे व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या सर्वांनाच १ आॅक्टोबर २०१८ पासून २ टक्के टीडीएस वजावट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित यंत्रणेला सेवा किंवा वस्तू पुरवठा करणाऱ्यास पाच दिवसांच्या आत आॅनलाईन टीडीएस प्रमाणपत्र देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. 

वस्तू व सेवाकर कायदा २०१७ चे कलम ५१ व त्यासंदर्भाने १३ सप्टेंबर २०१८ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार झालेल्या बदलांबाबतची माहिती राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त गंगाधर गवंडी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, शासकीय कार्यालये, आस्थापना मंडळे, शासकीय संस्था व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या संस्थांनी कोणत्याही पुरवठादाराकडून वस्तू अथवा सेवा खरेदी केली तर कराची वजावट (टीडीएस) करण्याची तरतूद आहे. केंद्राच्या वित्त विभागाने १३ सप्टेंबर रोजी नव्याने अधिसूचना जारी केली. त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबरपासून करावी लागणार आहे.

उपरोक्त संस्थांना कोणत्याही पुरवठादाराने अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची सेवा अथवा वस्तू पुरविली, तर त्यांना रक्कम देताना टीडीएस वजावट करावी लागेल. उदा. महापालिकेने ३ लाखांची खरेदी केली, तर पुरवठादार ३ लाख तसेच त्यावर सीजीएसटी व एसजीएसटी मिळून १५ हजार असे एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचे बिल देईल. परंतु, संबंधित पुरवठादाराला बिल अदा करताना मूळ ३ लाख रुपये रकमेवर एकूण २ टक्के टीडीएस म्हणजेच ६ हजार रुपये वजा करावे लागतील. ज्यामुळे प्रत्यक्ष पुरवठादाराला ३ लाख ९ हजार रुपये मिळतील. हा नियम सर्व शासकीय संस्थांना लागू आहे. त्याची संबंधित लेखा विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती गवंडी यांनी दिली. 

टीडीएस १० तारखेच्या आत भरा...टीडीएस वजावट केलेली रक्कम १० तारखेच्या आत शासनाच्या तिजोरीत आॅनलाईन चलनाद्वारे जमा नाही केली, तर उशिरा जमा केलेल्या रकमेवर कलम ५० (१) अन्वये १८ टक्के प्रमाणे व्याज आकारण्याची तरतूद आहे. तसेच आॅनलाईन टीडीएस प्रमाणपत्र पाच दिवसांच्या आत देणेही अनिवार्य केले असून, उशीर झाल्यास प्रत्येक दिवसासाठी १०० रुपये, जास्तीत जास्त ५ हजार रुपये एवढे विलंब शुल्क शासकीय तिजोरीत भरावे लागणार आहेत, हा बदलही गवंडी यांनी लक्षात आणून दिला.

टॅग्स :TaxकरlaturलातूरIncome Taxइन्कम टॅक्स