उत्तर भारतीय तरूणाकडून लातूरमधील मतिमंद मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 12:28 IST2018-10-09T12:00:10+5:302018-10-09T12:28:05+5:30

लातूरच्या शिरोळमध्ये मतीमंद तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

girl raped in Latur | उत्तर भारतीय तरूणाकडून लातूरमधील मतिमंद मुलीवर बलात्कार

उत्तर भारतीय तरूणाकडून लातूरमधील मतिमंद मुलीवर बलात्कार

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) -  दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन मिक्सर विकण्यासाठी आलेल्या एका उत्तर भारतीय तरूणाने मतीमंद तरूणीवर अत्याचार केल्याची घटना शिरोळ (वांजरवाडा) येथे सोमवारी (8 ऑक्टोबर) घडली. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

महंमदआशु दिलशाद कुरेशी असं तरूणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशमधील अलिगडचा रहिवासी आहे. घरात कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन मिक्सर विकण्यासाठी आलेल्या या तरुणाने पाणी देण्याचा बहाना केला. त्यानंतर घरात प्रवेश करून मतीमंद तरूणीवर अत्याचार केला. यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. तरुणीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर, हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: girl raped in Latur