शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक; दोन पिस्टल, खंजीर, वाहन जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: June 13, 2024 18:53 IST

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

लातूर : बँक, सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चौघांना दोन पिस्टल, १७ जीवंत काडतुसे, एक खंजरासह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी केली.

पोलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निलंगा भागात गस्तीवर होते. दरम्यान काही संशयित  हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पथकाने निलंगा-हाडगा मार्गावर उभा असलेल्या संशयितावर अचानक छापा टाकला. 

यावेळी वाहनासह व्यक्तीची झाडाझडती घेतली. मयुर नितीन आवचारे (वय २६), अक्षय रामदास टेकाळे (वय २१), विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी (वय ३१), निशांत राजेंद्र जगताप (वय ३१ सर्व रा. पुणे) यांना अटक केली तर शाम गायकवाड अंदाजे (वय २६, रा. बामणी ता. निलंगा) हा पळून गेला. अटकेतील टोळी ही बँक, सराफा दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून दोन पिस्टल, १७ जिवंत काडतुस, एक खंजीर, एक पांढऱ्या रंगाची गाडी (एम.एच. १४ एल.जे.३१६९) आणि मिरची पावडर असे दरोडा टाकण्याचे साहित्य एकूण १३ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. पल्लेवाड, पोउपनि. संजय भोसले, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, राजेश कंचे, योगेश गायकवाड, रवी कानगुले, चालक निटुरे यांच्या पथकाने केली आहे.

खुनाच्या गुन्ह्यानंतर दोघे आरोपी झाले होते फरार...निलंगा येथे ताब्यात घेतलेल्या आरोपीतील दोघे हे पुणे येथील मुन्ना जगताप गॅंगचे असून, त्यांनी ढमाले गॅंगच्या दिपक कदम याचा २९ मे २०२४ रोजी खून केल्याने उघड झाले आहे. याबाबत सांगवी आणि पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात हे आरोपी फरार झाले आहेत. 

दोघे लातुरातील खुनाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर...पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारपैकी दोघे जण हे लातुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे उघड झाले आहे. ते सध्या जामिनावर बाहेर सुटले होते.

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी