फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:16 IST2026-03-03T16:15:30+5:302026-03-03T16:16:09+5:30

रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडपल्याचा आरोप

Finance scam worth Rs 27 lakh Case registered against five employees in Latur | फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

फायनान्समध्ये २७ लाखांची अफरातफर; लातुरात पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल


लातूर : शहरातील एका खाजगी फायनान्स कंपनीत लाखो रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 'भारत फायनान्सियल इन्क्लुजन लिमिटेड' या कंपनीत कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बँकेचे एकूण २७ लाख १२ हजार ५३६ रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची फसवणूक केली आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नितीन दिलीप आडे (वय ३१, रा. लातूर) हे या कंपनीत युनिट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, २३ मे २०२४ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत, आरोपींनी श्री चन्नाबसवेश्वर कॉलेजच्या मागे असलेल्या 'माताजी नगर' येथील कार्यालयात हा गैरप्रकार केला.

आरोपींनी ग्राहकांकडून गोळा केलेली अथवा बँकेच्या व्यवहारातील रक्कम अधिकृतरीत्या बँकेत जमा न करता, ती परस्पर हडप केली असून, ​याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिपक चंद्रकांत पोटावळे (रा. अहमदपूर), मनोज एकनाथ कसबे (रा. कंधार, जि. नांदेड), ज्ञानेश्वर विश्वनाथ पेंढारकर (रा. लातूर), सोमनाथ नारायण तपघाले (रा. अहमदपूर) आणि पवन जयदेव पुरी (रा. उदगीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.बी. आंधळे हे करीत आहेत.

Web Title : लातूर: फाइनेंस कंपनी में 27 लाख की हेराफेरी, पांच कर्मचारी गिरफ्तार

Web Summary : लातूर में एक फाइनेंस कंपनी के पांच कर्मचारियों ने 27 लाख रुपये का गबन किया। उन्होंने जमा के लिए रखे धन को हेराफेरी कर धोखाधड़ी की। विवेकानंद चौक पुलिस स्टेशन में मामला दर्ज, जांच जारी है।

Web Title : Latur: 2.7 Million Embezzlement in Finance Company; Five Employees Booked

Web Summary : Five employees of a finance company in Latur embezzled ₹2.7 million. They diverted funds meant for deposit, leading to fraud. A police case has been registered against them at Vivekanand Chowk police station. Police investigation is underway.