शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मैदाने खुलली अन्‌ खेळाडूंच्या चेहऱ्यांवरील हास्यही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : क्रीडा संकुल बंद असल्याने दोन महिने घरातच शारीरिक कसरती करीत खेळाडूंनी आपली लय कायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : क्रीडा संकुल बंद असल्याने दोन महिने घरातच शारीरिक कसरती करीत खेळाडूंनी आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनीही घरच्या घरीच वॉकिंग व सायकलिंगचा आधार घेत व्यायामाची आवड कायम ठेवली. आता अनलॉक झाल्याने मैदाने खुली झाली आहेत. त्यामुळे खेळाडूंसह व्यायामप्रेमींच्या चेहऱ्यांवरील हास्यही खुलले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून क्रीडा संकुल बंद होते. परिणामी, खेळाडूंचा हिरमोड झाला. कौशल्य वाढीसाठी मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंना घरच्या घरीच व्यायाम करीत शारीरिक तंदुरुस्ती ठेवावी लागली. वॉकिंग ट्रॅक बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह सामान्यांचीही परवड झाली. त्यामुळे व्यायामप्रेमींनी घरच्या घरीच व्यायामाला पसंती देत योगासन, प्राणायामासह हलक्या स्वरूपाच्या व्यायामाला घरातच सुरुवात केली. दोन महिन्यांनंतर शासनाने अनलॉक केले. पहिल्या फेजमध्ये लातूर असल्याने क्रीडा संकुलासह वॉकिंग ट्रॅक खुले झाले. त्यामुळे आता सकाळ-सायंकाळच्या सत्रात खेळाडूंसह नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी आपला वेळ देत आहेत. व्यायामप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विविध इनडोअर हॉल सुरू झाल्याने बॅडमिंटनसह इतर खेळाच्या खेळाडूंनीही सरावास सुरुवात केली आहे. जलतरण तलावही खुले झाल्याने खेळाडूंसह पोहण्याचा छंद जोपासणारे पुन्हा डुबकी मारताना दिसून येत आहेत. शहरातील जीमही सुरू झाल्याने युवक शारीरिक कसरती करीत घाम गाळतानाचे चित्र दिसून आले. एकंदरित, व्यायामाची हौस असणारे हौशी तंदुरुस्तीसाठी पुन्हा फिटनेसवेडे झाल्याचे चित्र आहे.

क्रीडा संकुलात पुन्हा रौनक

मध्यवर्ती ठिकाण असल्याने क्रीडा संकुलात नेहमीच खेळाडूंसह नागरिकांची गर्दी असते. यासह दयानंद महाविद्यालय, नाना-नानी पार्क, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह प्रभागातील वॉकिंग ट्रॅकवर नागरिक व्यायाम करतानाचे चित्र आहे. अनलॉक झाल्याने क्रीडा संकुलात पुन्हा रौनक दिसत आहे.

खेळाडूंचा सराव...

आऊटडोअर खेळात व्हॉलीबॉलसह क्रिकेट, सॉफ्टबॉल, लॉन टेनिस, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, थ्रोबॉल, बेसबॉल यासह अनेक खेळांचे खेळाडू क्रीडा संकुलासह अन्य मैदानांवर दैनंदिन सरावासाठी दिसत आहेत. यंदाही स्पर्धा होणार की नाही, असा प्रश्न असला तरी खेळाडू अनलॉकमुळे सरावात व्यस्त दिसत आहेत.

सरावामुळे आनंद मिळतो...

गतवर्षी कोरोनामुळे अनेक महिने मैदाने बंद होती. कशीबशी लय लागली असतानाच यंदाच्या वर्षीही दोन महिने सराव बंद होता. त्यामुळे लय बिघडली होती. आता अनलॉक झाल्याने सरावाला सुरुवात केली असून, सरावामुळे आनंद मिळत असल्याचे राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू कृष्णदेव पोतदार याने सांगितले.

सातत्य टिकविण्यासाठी प्रयत्नशील...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मैदाने बंद होती. त्यामुळे खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण झाले. सराव बंद असल्याने अडचणी होत्या. सातत्य टिकविण्यासाठी दैनंदिन सराव महत्त्वाचा आहे. अनलॉक झाल्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यांवर आनंद आहे. कोरोनाचे नियम पाळून सराव सुरू असल्याचे बॅडमिंटन प्रशिक्षक आनंद खुब्बा म्हणाले.