परचंडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या, झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

By राजकुमार जोंधळे | Updated: September 4, 2022 22:15 IST2022-09-04T22:15:01+5:302022-09-04T22:15:27+5:30

मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.

Farmers suicide in Parchanda dead body found hanging from a tree | परचंडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या, झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

परचंडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या, झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला मृतदेह

अंधोरी (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील एका शेतकऱ्याचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवार-शनिवारच्या रात्री घडली. दिलीप प्रभाकर पुट्टेवाड (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात मयताचे वडील प्रभाकर नामदेव पुट्टेवाड यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची रविवारी नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

घटनास्थळी किनगाव पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पलमटे करत आहेत.

Web Title: Farmers suicide in Parchanda dead body found hanging from a tree

टॅग्स :Farmerशेतकरी