नागरसोगा येथील शेतकऱ्यांनी औसा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संवाद साधला. शेतीपंपाची शेतकऱ्यांना आलेली भरमसाठ बिले, त्यात गत अधिवेशनात शेतकऱ्यांची वीज बिले ५० टक्के माफ करणे, शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणार नाही, अशा घोषणा सरकारने केली हाेती. मात्र अधिवेशन संपताच ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल वसुली केली जाणार, अशी घोषणा केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच दोन-तीन दिवसांपासून गावातील, शिवारातील डीपीचा वीजपुरवठा महावितरणकडून ताेडण्यात आला आहे. परिणामी, पाणी असूनही पिके वाळून जात आहेत. यावेळी शेतकरी दिलीप सूर्यवंशी, पचायत समिती सदस्य दीपक चाबूकस्वार, उपसरपंच बंडू मसलकर, भास्कर सूर्यवंशी, शिवाजी फावडे, मधुकर सूर्यवंशी, अजित मुसांडे, रमाकांत मुसंडे, माजी सैनिक माधव सूर्यवंशी यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी साधला महावितरणशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST