शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:14 PM

या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

लातूर : वाळून गेलेला ऊस, तीन महिन्यावर आलेले मुलीचे लग्न, हाताला कामही नाही़. झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून लातूर तालुक्यातील सारसा येथील भूजंग पवार या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सारसा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची हालक्या जमीनीवरील उस वाळून गेले आहे़. सारसा येथील भूजंग माणिकराव पवार (वय ४५) यांना तीन एकर शेती आहे़ त्यांनी यावर्षी ऊसाची लागवड केली होती़. पाणी नसल्याने उसाची पाचट झाली़ मुलीचे लग्न जमवून तारीखही काढली होती़. फेब्रुवारी महिन्यात मुलीचे लग्न करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करावी, याची त्यांना चिंता लागली होती़ उसही वाळून गेल्याने खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता़ त्यातच हाताला कामही नसल्याने घरखर्च भागविणेही कठीण झाले होते़.

दुष्काळी परिस्थितीत झालेली नापिकी व कर्ज कसे फेडायचे यातून त्यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी सांगितले़. याबाबतची माहिती मुरूड पोलिसांना देण्यात आली असून सकाळी १०़३० वाजेपर्यंत प्रेत काढण्यात आले नव्हते़ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय प्रेत काढू नका, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे़. 

हाताला कामही नाही़...पाऊस नसल्याने या भागात मजुरांना कामेही नाहीत़ भूजंग पवार हे मुलीच्या लग्नासाठी पैसे कोठून जमवायचे या चिंचेत होते़ उसाचीही पाचट झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत़.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती