VIDEO- पाण्यासाठी काहीही; बांधावरच होते श्रमदानाला येणाऱ्याची मोफत दाढी अन् कटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 12:15 IST2018-04-20T11:44:09+5:302018-04-20T12:15:29+5:30
श्रमदानाची चळवळ गातिमान झाली आहे. श्रमदान करणाऱ्याचा वेळ जावु नये म्हणुन गुरधाळ येथील कारागीराने चक्क शेतीच्या बांधावर दाढी कटींग करण्यास सुरवात केली

VIDEO- पाण्यासाठी काहीही; बांधावरच होते श्रमदानाला येणाऱ्याची मोफत दाढी अन् कटिंग
देवणी ( लातूर ) : तालुक्यात श्रमदानाची चळवळ गातिमान झाली आहे. श्रमदान करणाऱ्याचा वेळ जावु नये म्हणुन गुरधाळ येथील कारागीराने चक्क शेतीच्या बांधावर दाढी कटींग करण्यास सुरवात केली असुन श्रमदानाला येणाऱ्या सर्वाची मोफत दाढी कटींग करण्याचे जाहीर केल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे,
गावाने सध्या पाणी फाउंडेशन चे वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्या धर्तीवर श्रमदानाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र गावातील काही शेतकरी दाढी कटींग करण्यासाठी दिवसभर फिरत असल्याचे हेरुन येथील कारागीर गोपाळ गुरधाळकर यांने वेळ वाया जावु नये म्हणुन चक्क बांधावरच दाढी कटींग तेही मोफत करुन याकामाला हातभार लावण्याचे जाहीर केले आहे.काम करणारे बहुतांश नागरिक दाढी कटींग करत असुन हा देवणी तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारागीर हा बारा बलुतेदार पैकी एक असुन यांची उपजिविका ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांकडे पिकले तरच आपणाला मिळणार यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पिकण्यासाठी श्रमदानातुन पाणी मुरवणे गरजेचे आहे.
अमीर खानचीही दाढी करणार
याबाबत गोपाळ गुरधाळकर म्हणाले की ,आपण श्रमदान करणाऱ्याची दाढी कटींग करत आहोत.पण अमीर खानने सुरु केलेली पाणी फाउंडेशन योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरणार आहे. अमीर खानने येथे येवून श्रमदान करावे अन् मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी आशा फेसबुकवरुन अमीर खानला पाठवल्यानंतर टाळ्या वाजवुन प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.