शेकापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:48+5:302021-09-25T04:19:48+5:30

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी गटसचिव संघटनेने पुढाकार घेतला ...

Election of Shekapur Society unopposed | शेकापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध

शेकापूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी गटसचिव संघटनेने पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी या संघटनेला शेकापूर संस्था बिनविरोध काढण्यास यश आले आहे. गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम बिरादार, बी.एच. भंडे, हंसराज मोमले, निवडणूक निर्णय अधिकारी सी. एम. मोमले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

या संस्थेसाठी बाळासाहेब नवाडे, मारोती मोरे, विजयकुमार कासले, आनंद सावंत, सुधाकर पाटील, मधुकर सावंत, नरसिंग शेल्हाळे, व्यंकट पांचाळ, मालनबाई कोनाळे, वंदनाबाई शेल्हाळे, भानुदास कांबळे, रतन कोनाळे, व्यंकट हलकरे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तिसऱ्यांदा ही संस्था बिनविरोध निघाली असून या गावकऱ्यांचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम बिरादार यांनी केले आहे.

Web Title: Election of Shekapur Society unopposed