जुगार खेळताना आठ जणांना पकडले; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By संदीप शिंदे | Updated: May 20, 2023 19:54 IST2023-05-20T19:53:53+5:302023-05-20T19:54:07+5:30
याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगार खेळताना आठ जणांना पकडले; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
उदगीर : येथील पोलिस क्वॉर्टरच्या समोरील एका दुकानामध्ये पत्त्यांवर पैसे लावून अंदर-बाहर नावाचा जुगार काहीजण खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. यात ८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलिस क्वाॅर्टरच्या समोर एका दुकानात ५२ पानी पत्त्यांवर स्वतःच्या फायद्यासाठी अंदर-बाहर नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम ३२ हजार व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस कर्मचारी रूपेश कज्जेवाड यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिराने शहर पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.