वर्षभरात ९५.६८ टक्के रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:03+5:302020-12-31T04:20:03+5:30
अत्याधुनिक कोविड सेंटरची उभारणी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने अल्प कालावधीत अत्याधुनिक कोविड सेंटर निर्माण केले आहे. ऑक्सिजन ...

वर्षभरात ९५.६८ टक्के रुग्ण झाले बरे
अत्याधुनिक कोविड सेंटरची उभारणी
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने अल्प कालावधीत अत्याधुनिक कोविड सेंटर निर्माण केले आहे. ऑक्सिजन बेडसह आयसीयू, एनआयसीयू विभागाची निर्मिती या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली. तब्बल १८८ बेडची सोय या रुग्णालयात करण्यात आली. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर या कोविड केअर सेंटरमध्ये वेळेत उपचार झाल्याने कोरोनावर मात करण्यात यंत्रणेला यश आले.
प्रयोगशाळा, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र
कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातूरसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय उपकेंद्र लातूरसाठी मंजूर करून घेतले आहे, ही मोठी उपलब्धी असून, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक प्रयोगशाळाही उभारली आहे. स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात होते. मात्र लातुरातच प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने चाचण्यांचा अहवाल तात्काळ प्राप्त होऊ लागला.